सरपंचांनी गावच्या विकासासाठी झोकून द्यावे : महादेव माळी

0
Rate Card

जत : गावातल्या जनतेने मोठ्या अपेक्षेने आपल्याला सरपंच म्हणून निवडून दिलेले असते,त्यामुळे आपण सर्व सरपंच मंडळींनी आपल्या गावाच्या विकासासाठी झोकून देऊन गावाची सेवा करावी असे आवाहन महादेव माळी यांनी केले.तालुक्यातील 116 ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांची “आमचा गाव आमचा विकास” अंतर्गत 15 वा वित्त आयोगासाठी गाव विकासासाठी आराखडा तयार करण्यासंदर्भात जत पंचायत समिती येथे दोन दिवसीय प्रशिक्षण पार पडले,प्रशिक्षक महादेव माळी यांनी मार्गदर्शन केले.

दोन दिवसीय या प्रशिक्षणाचे उद्‍घाटन सभापती सुशिला तावंशी आणि गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तेकर यांच्या हस्ते झाले.प्रशिक्षणासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मनोज जाधव,पांडूरंग चव्हाण व सर्व कर्मचारी वर्गाने योग्य नियोजन केले होते.सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी सर्व प्रशिक्षक,पंचायत समिती पदाधिकारी, प्रशासन, सरपंच व ग्रामसेवक यांचे आभार मानले.

जत येथील संरपत,ग्रामसेवक प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.