आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुंटुबियांचे तुकाराम महाराजाकडून कुंटुबियाचे सांत्वन,आर्थिक मदत

0
Rate Card

माडग्याळ,वार्ताहर : लमाणतांडा (उटगी) ता.जत येथील दिव्यांग शेतकरी सुभाष धर्माणा मुचंडी या आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्यांच्या पत्नीस गोंधळेवाडी मठाचे मठाधिपती हभप तुकाराम महाराज यांनी भेट घेत सांत्वन करून आर्थिक मदत केली.तालुक्यातील अन्य दानशूर व्यक्तीने मुंचडी यांच्या कुंटुबियांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

लमाणतांडा (उटगी)येथील शेतकरी सुभाष मुचडी यांनी स्वताच्या मालकीच्या शेतात आत्महत्या केल्याची दुखःद घटना घडली आहे.मयत शेतकरी सुभाष मुचंडी हे मूळ सोन्याळ गावचे असून ते लमाणतांडा (उटगी) येथील स्व:ताच्या मालकीच्या पाच एकर शेतातील पत्रा शेड असलेल्या साध्या घरात राहतात. गुरुवारी सकाळी सहाच्या दरम्यान प्रात: विधीसाठी गेले असता,आपल्या शेतातील लिंबाच्या झाडास धोतराच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. मयत सुभाष हे एका हाताने दिव्यांग होते. परिसरातील दिव्यांगाना विविध सरकारी योजनांची माहिती देणे व दिव्यांग दाखले काढण्यासाठी मदत करायचे वेळप्रसंगी दिव्यांग दाखले काढण्याच्याकामी सोबत सांगलीला जायचे.घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मोलमजुरीची कामे करायचे. 

मयत सुभाष यास भ्रमणध्वनीद्वारे हिंदी भाषेतून ग्लोबल फायनान्सियल कंपनीकडे पैसे गुंतवणूक करण्यासाठी सतत एका महिलेकडून मोबाईलद्वारे संपर्क केला जायचा,तुम्हाला पाच लाख रुपये दिले जातील,असे आश्वासन दिले जात होते. त्यास सुभाष बळी पडले.त्यांनी चार टप्यात थोडेथोडे असे एकूण दीड लाख रुपये कथित कंपनीच्या गुजरात बँकेच्या शाखेतील खात्यात वर्ग केले होते.ते पैसे त्यांनी त्यांचा मित्र

रविकुमार मेत्री यांच्याकडून घेतले होते.

माझे कंपनीकडून पाच लाख रुपये येणार आहेत ते आल्यावर तुला परत देतो असे सांगितले कोणती कंपनी असे ? मित्राने विचारले असता माझे  ग्लोबल फायनान्सियल कंपनी कडे पाच लाख रुपये येणार आहे असे सांगितले. आपल्या मित्राची फसवणूक झाल्याचा संशय डॉ.रविकुमार मेत्री यांना आला त्यांनी इंटरनेट वर सर्च केले असता सदर नावाची कंपनी नसल्याचे लक्षात आले .सुभाष ज्या खात्यावर पैसे जमा करायचा त्याचा शोध घेतला असता ते बँक खाते “बँक ऑफ बडोदा” बँकेच्या गुजरात राज्यातील वडोदरा येथील नवयार्ड येथील शाखेत असल्याची खात्री झाली त्यानंतर डॉ मेत्री यांनी सदर बँकेच्या शाखाधिकारी शी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून आपल्या शाखेत ग्लोबल फायनान्सियल कंपनी नावाच्या बोगस कंपनीचे बँक खाते असून ते ब्लॉक करण्याची विनंती केली असता त्या बँकेच्या अधिकार्याने सदर कंपनी विरुद्ध पोलिसात तक्रार करून तक्रारीची प्रत बँकेत देण्याचे सांगितले.त्यास अनुसरून मयत सुभाष मुचंडी हे दि., 10 ऑक्टोबर 2019 रोजी कंपनीच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी आपल्या मित्रासह उमदी पोलीस ठाण्यात गेले होते. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जत येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर असल्याने उमदी येथील पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी जतला गेले असल्याने तक्रार घेण्यासाठी सबंधित कर्मचारी उपस्थित नव्हते त्यामुळे तक्रार करण्यासाठी उद्या पोलीस स्टेशनला या असे उमदी पोलिसांतून सांगण्यात आले.दुसऱ्या दिवशी मयत सुभाष हे तक्रार देण्यासाठी उमदी पोलिसात गेलेच नाही. दुसऱ्या दिवशी उमदी पोलिसांत तक्रार करण्यासाठी मयत सुभाष गेले असते तर मयताचे प्राण वाचले असते .त्यानंतर कोणतेही कर्ज मिळाले नाही.संबधित महिलेचा संपर्क बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे सुभाष यांच्या लक्षात आले होते.तेव्हापासून त्यांनी व मित्र रविकुमार यांनी संबधित खात्याची माहिती काढली 

 उटगी : येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सुभाष मुंचडी कुंटूबियांची तुकाराम महाराज यांनी भेट घेत आर्थिक मदत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.