जत तालुक्यात विमा कंपनीने जादा कर्मचाऱ्यांमार्फत पंचनामे करावेत | प्रकाश जमदाडे यांची मागणी

0

जत,प्रतिनिधी : जत तालुका हा महाराष्ट्रात सर्वात मोठा तालुका असून तालुक्यावर कायम निसर्गाची अवकृपा आहे.सध्या परतीच्या पावसाने जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.तालुक्यात विमा कंपनीचे काम करण्यासाठी एकच कामगार असल्याने नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी येत असून विमा कंपन्यांनी जादा कर्मचारी नेमून शेतकऱ्यांना पिकांची आर्थिक नुकसानभरपाई मिळण्यास मदत करावी अशी मागणी माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी  राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Rate Card

निवेदनात म्हटले आहे की, जुलै 2019 अखेर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी 114 टँकर चालू होते.परंतु परतीच्या  पावसाने तालुक्यात,बाजरी,तूर,द्राक्ष डाळींब,मका,भुईमुग आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.गेल्या तीन वर्षापासून शेतक-यांची कधी पाण्याअभावी तरी कधी जास्त पाण्याने हातातोंडाशी आलेली पीके गेलेली आहेत.शेतक-याच्या पिकांच्या नुकसानीसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने विम्याच्या तरतूद केली आहे.पंरतू विमा कंपन्या शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याऐवजी शेतक-याचे पैसे लाटत असल्याचा अनुभव आहे.शेतक-यांनी विमा भरलेल्या रकमेच्या 10 टक्के ही नुकसान भरपाई मिळत नाही.सन 2019-20 च्या खरीप पिकासाठी जत तालुक्यातील 88126 शेतक-यांनी 55740 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरुन कंपनीकडे साधारणपणे 2.44 कोटी रु भरले आहेत .त्यांची 18 कोटी रु नुकसान भरपाई अपेक्षित आहे.पंरतु जत तालुक्यात 123 महसूली गावे आहेत.नुकसानीचा पंचनामा करताना विमा कंपनीचा प्रतिनिधी प्रत्येक प्लॉटवरती जाऊन त्यांचा फोटो असणे आवश्यक आहे.तरच विमा कंपनी नुकसान भरपाई देणार आहे.परंतु जत तालुक्यात या कंपनीचा एकच कर्मचारी कार्यरत आहे.त्यामुळे एकाच कर्मचा-याकडून सर्व शेतक-याचे पंचनामे होणे शक्य नाही .तरी अतिरिक्त कर्मचारी नेमून त्वरीत पंचनामे करुन शेतक-याना 100 टक्के नुकसार भरपाई देण्याची मागणी माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.