तालुक्याचा कुंटुबप्रमुख म्हणून काम करणार : आ.विक्रमसिंह सांवत | डफळापूर जि.प.गटात आभार दौरा

0

डफळापूर : जत तालुक्यातील जनतेनी दिलेल्या मताधिक्याने माझी जबाबदारी दुपट्ट वाढली आहे.त्यामुळे यापुढे तालुक्यातील जनतेचा कुंटुबप्रमुख म्हणून काम करणार आहे,असे प्रतिपादन आ.विक्रमसिंह सांवत यांनी केले.

आ.सांवत यांनी गुरूवारी डफळापूर जिल्हा परिषद मतदार संघात आभार दौरा केला.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जि.प.सदस्य महादेव पाटील,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग,राम पाटील,अरविंद गडदे आदी मान्यवर उपस्थित होते.खलाटी पासून सुरू झालेल्या दौऱ्याची डफळापूर येथे सांगता झाली.गावातून विजयी फेरी काढण्यात आली.

सांवत पुढे म्हणाले,डफळापूर जिल्हा परिषद गटातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली आहे.जनतेचा मी ऋणी राहिन.यापुढे पाच वर्षात कामाच्या रूपातून या ऋणाची परतफेड करण्याचा प्रयत्न करीन, असेही आ.सांवत शेवटी म्हणाले.

Rate Card

जि.प.सदस्य महादेव पाटील म्हणाले,तालुक्यातील जनतेनी दिलेला जनादेश हा विकास करणाऱ्या नेतृत्वाला दिला आहे.

दिग्विजय चव्हाण म्हणाले,डफळापूर मतदार संघातील प्रंलबित प्रश्न असणारे म्हैसाळची उर्वरित कामे,रस्त्यासह अनेक विकास कामे विक्रमदादा करतील,नुकत्याच झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.त्यांचे सरसकट पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी दादांनी शासन दरबारी आवाज उठवावा अशी विनंतीही चव्हाण यांनी यावेळी केली.बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, प्राचार्य वंसत पाटील यांची भाषणे झाली.प्रा.रणजीत चव्हाण यांनी स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.