जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील वाळू तस्करी महसूल यंत्रणेचे वाभाडे काढत असतानाही महसूलची सुस्त यंत्रणा लक्ष द्यायला तयार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील सोनलगी,सुसलाद येथील बोर नदी भरून वाहत असतानाही दिवसाढवळ्या वाळू काढण्यात येत आहे.उमदी पोलीस ठाणे,संख महसूलची हप्तेखोर यंत्रणा या वाळू तस्करांच्या पाठीशी ठाम असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. दररोज शेकडो टँक्टर नदीतून बेसुमार वाळू काढत असतानाही पोलीस यंत्रणा अथवा महसूलचे अधिकारी कारवाई करत नाहीत हे विशेष सर्वाच्या वरकमाईमुळे प्रशासन गांधारीच्या भूमिकेत तर वाळू तस्कर सुसाट आहे.
जत तालुक्यातील सुसलाद,सोनलगी बोर नदी वाळू तस्करांनी केलेला वाळूसाठ्यातून उचलून राहिलेली वाळू व टँक्टर





