आठ महिन्यानंतरही पंतप्रधान सन्मान योजनेच्या निधीची प्रतिक्षा | उमदीतील हाजारो शेतकरी वंचित

0
Rate Card

उमदी,वार्ताहर : सरकारच्या वतीने सरसकट शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा निधी उमदी परिसरातील कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नसुन या बाबत नुसती टोलवाटोलवी सुरू आहे.तातडीने हा निधी द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी जि.प.सदस्य अँड.चन्नाप्पा होर्तीकर यांनी दिला आहे. 

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यां च्या खात्यात वार्षिक 6 हजार रुपये जमा करणार असल्याचे सांगण्यात आले होते, त्यासाठी तलाठी यांच्याकडे आधार कार्ड व पासबुक झेरॉक्स जमा करावीत असे आव्हान तहसीलदार यांनी केल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सर्व  कागदपत्रे संबंधित तलाठी यांच्याकडे  देवूनही अद्याप रक्कम जमा झालेले नाहीत. 

सर्व कागदपत्रे जमा करून आठ महीने उलटूले तरीही उमदी परिसरातील शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने या संबंधित अधिकाऱ्यांच्या कारभाराविरुद्ध परिसरातील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन शासनाने जाहीर केलेल्या सन्मान योजनेच्या निधीची रक्कम खात्यात जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.महसूल विभागाकडून पोर्टल वर याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत असे महसूल विभागाकडून सांगण्यात येते, मग निधी जमा करण्यात अडचण काय आहे?योजनेचा निधी खात्यावर वर्ग होत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. येत्या आठ दिवसात निधी जमा झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य अँड.चन्नाप्पा हॉर्तीकर सह शेतकऱ्यांनी दिला आहे.

       

             

आठ दिवसांत निधी खात्यात निधी जमा करु:तहसीलदार सचिन पाटील

जत तालुक्‍यात 62 हजार शेतकऱ्याची नावे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आहेत.त्यापैकी 58 हजार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये रक्कम मिळालेली आहे तरी उर्वरित 4 हजार शेतकरी यांना याचा लाभ मिळालेला नाही. काही तांत्रिक अडचणी मुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही  यासाठी सोमवार पासून संबंधित गावातील कर्मचाऱ्यांचे कँम्पस लावले असून आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर सन्मान योजनाचा निधी जमा होईल.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.