डफळापूरात डेंगूचे 5 रुग्ण सापडले डासांचे थैमान : औषध फवारणी,सर्व्हेशन कधी,नागरिक संतप्त

0
Rate Card

डफळापूर : डफळापूरात डेंगूचे थैमान घातले आहे.गाव भागातील सुवर्णा उबाळे,आकाश कांबळे,पल्लवी कांबळे,रमेश कांबळे,संकेत कर्पे 

यासह सुमारे 11 रुग्णांना डेंगू झाल्याचे निष्पन्न झाले असून यातील अनेक रुग्णांची प्रकृत्ती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.गेल्या महिन्यापासून डफळापूरातील पंचवीसवर रूग्ण डेंगू सदृश तापाने फणफणले आहेत.यापुर्वी डेंगू निष्पण होऊनही ग्रामपंचायत व आरोग्य विभाग सुस्त असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

घाणीचे साम्राज्य, पावसामुळे साठलेली डबकी यामुळे डासांचे थैमान माजले आहे.या डांसाचा डंक बळावला असून नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. इतके होत असतानाही डफळापूर ग्रामपंचायतीकडून कोणतीही उपाय योजना होत नसल्याचे वास्तव आहे. डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश असतानाही आरोग्य विभागाची यंत्रणा कुचकामी ठरली आहे.परिणामी नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. 

जीव गमावल्यावर उपाययोजना करणार काय

डफळापूर येथे महिन्यापासून डेंगूचे रुग्ण सापडत आहे.ग्रा.प.सदस्यही डेंगू झाल्याचे निष्पन्न झाले होते.डबकी,गटारीची स्वच्छता, औषधे फवारणी करण्याची मागणी करूनही ग्रामपंचायत,आरोग्य विभागाकडून कारवाई होत नाही. नागरिकांचा जीव गेल्यावर उपाय योजना करणार काय?असा संतप्त ग्रा.प.सदस्य मुरलीधर शिंगे यांनी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.