मिनी मंत्रालयातून विक्रमसिंह सांवत मंत्रालयात

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसचे आमदार झालेले विक्रमसिंह सांवत हे जत तालुक्यातील मिनी मंत्रालय ते विधानसभेत जाणारे तिसरे नेते ठरले आहेत.यापुर्वी जिल्हा परिषद सदस्य असलेले विलासराव जगताप व पंचायत समिती सदस्य असलेले मधुकर कांबळे हे आमदार झाले आहेत.

कॉग्रेसचे तालुक्यातील युवा चेहरा असलेले विक्रमसिंह सांवत यांनी मोठ्या संघर्षातून हे यश मिळविले आहे.गत निवडणूकीत अगदी अल्पमतातील पराभव पचवून त्यांनी सलग पाच वर्षे कॉग्रेसची मजबूत बांधणी केली.कोणतेही मोठे अनभुवी नेते नसतानाही तरूण नवख्या युवक नेत्यांच्या बळावर ते आमदार झाले आहेत.

सांवत यांना मोठा राजकीय वारसा आहे.त्याचे आजोबा यंशवंतराव सांवत हे डफळे संस्थाचे राजे विजयसिंह डफळे यांच्या लोकनियुक्त मंत्रीमंडळाचे मुख्यमंत्री होते.त्याशिवाय त्यांच्याकडे संस्थाची सरदारकी होती.राज्यातील ताकतवान नेते स्व. पंतगराव कदम हे सांवत यांचे काका होते.त्याचबरोबर त्यांच्या आईचे वडील हे येरवडा जेलचे जेलर होते.असा मोठा वारसा लाभेलेले सांवत यांना मोठ्या कष्ठाने व जनतेशी नाळ जोडल्यानंतर आमदार पदापर्यत झेप घेता आली आहे. अगदी तरूण असलेले सांवत यांचा भविष्य काळ उज्वल असून जिल्ह्याचे किंबहुना राज्यात नेतृत्व करण्याची संधी त्यांना भविष्यात मिळू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.