पावसाचा दणका,दिवाळी बाजारपेठेला फटका | जत शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावर पाणी : दलदलमुळे बेहाल

0जत,प्रतिनिधी : सलग तीन दिवस पडत असलेल्या पावसामुळे जतेत नागरिकांची अक्षरक्षाः तारांबळ उडाली आहे.

शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे तर दिवाळी बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र होते. शहरातील सर्व प्रमुख चौक आणि रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. शहरातील प्रत्येक भागात पाणी साचून राहिल्याने जतकरांनी दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडण्यापेक्षा घरीच राहणे पसंत केले.तर पहिल्या दिव्यालाच दलदल,राडेराडचे ग्रहण लागले. या पावसामुळे व्यापारी आणि हातगाडी चालकांच्या मालाचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे बाजारपेठेवर पाणी फिरले आहे.

हवामान खात्याने सलग तीन दिवस मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली होती. हे तंतोतंत खरे ठरले.सलग पावसाने जोरदार आगमन करत शहराची दयनीय अवस्था केली. शहरातील सर्वच सखल भागात पावसाचे पाणी साचून राहिले आहे.तसेच काही अपार्टमेंटच्या तळमजल्यात पाणी साचून राहिले आहे ते मोटारीव्दारे बाहेर काढण्यात येत आहे.

शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक जलमय

शुक्रवारी झालेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक जलमय झाले.मुख्य चौकात पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.अनेेेक

Rate Card

रस्त्यावर पाणी होते. यातून वाहन काढत असताना अनेकजण पडले. तसेच अनेक वाहने या पावसाच्या पाण्यात अडकल्याने बंद पडली त्यामुळे या वाहनधारकांची धावपळ झाली.पाणी साचल्यामुळे अनेकांनी मार्ग बदलला. शहरातील निम्म्यापेक्षा अधिक रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.

मोकळय़ा प्लॉटमध्ये पाणी साचून हे पाणी रस्त्यावर आले होते. चिखलातून आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना त्रास होता होत

पावसाचा दणका

सलग पावसाने दणका दिल्यामुळे दिवाळीच्या खरेदीला आलेल्या जतकरांची तारांबळ उडाली.रस्त्यावर साहित्य विकणाऱयांचे मोठे नुकसान झाले. अनेक दुकानदारांचा दुकांनाबाहेर ठेवलेला मालही भिजला. दिवाळीची बाजारपेठेमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती.पण, दुपारच्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडविली आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.