डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथे डेंगूच्या साथीने थैमान घातले असून आतापर्यत सुमारे 7 जणांना डेंगू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.तर शेकडोजण तापाने फणफणले आहे.डफळापूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीला यांचे गांर्भिर्य नसल्याचा आरोप मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांनी केला आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे गावात अनेक ठिकाणी डबकी निर्माण झाली आहे.गटारी तुंडूब आहेत.त्यांच्या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायती प्रयत्न करत नाही.जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांचे कर्मचाऱ्यावरचे नियंत्रण सुटले आहे.कर्मचारी डुटीवर असतानाही कुठेही फिरत आहेत.मात्र डेंगूसारख्या गंभीर आजाराने थैमान घातले असतानाही त्यांच्याकडून सर्व्हेशन किंवा डांसाची उत्पती रोकण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे जनता त्रस्त झाली असून एकाद्याचा जीव गेल्यावर सर्व विभाग जागे होणार आहेत, काय असा संप्तत सवालही गायकवाड यांनी शेवटी उपस्थित केला.





