सांगली जिल्ह्यात महाआघाडीची आघाडी
सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या मतमोजणीचे जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर करण्यात आले असून सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. विधानसभा मतदारसंघनिहाय विजयी झालेले उमेदवार व कंसात पक्ष पुढीलप्रमाणे.
281-मिरज (अ.जा.)– श्री. सुरेश (भाऊ) दगडू खाडे (भारतीय जनता पार्टी), 282-सांगली – धनंजय उर्फ सुधीर हरी गाडगीळ (भारतीय जनता पार्टी), 283-इस्लामपूर – जयंत राजाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), 284-शिराळा – मानसिंग फत्तेसिंगराव नाईक (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), 285-पलूस-कडेगाव – कदम विश्वजीत पतंगराव (इंडियन नॅशनल काँग्रेस), 286-खानापूर – अनिलभाऊ बाबर (शिवसेना), 287-तासगाव-कवठेमहांकाळ – सुमनवहिनी आर आर (आबा) पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), 288- जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत (इंडियन नॅशनल काँग्रेस).
विधानसभा मतदानसंघनिहाय अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त मते उमेदवार, कंसात त्यांचा पक्ष व त्यांना मिळालेली मते व नोटा पर्यायाला मिळालेली मते पुढीलप्रमाणे –
281-मिरज (अ.जा.)– (1) डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे (भारतीय जनता पार्टी) – 96369, (2) बाळासो दत्तात्रय होनमोरे (स्वाभिमानी पक्ष) – 65971, (3) नानासो सदाशिव वाघमारे (वंचित बहुजन आघाडी) – 8902. नोटा – 2792. या मतदारसंघात 177092 मते वैध ठरली तर 191 मते अवैध ठरली.
282-सांगली – (1) धनंजय उर्फ सुधीर हरी गाडगीळ (भारतीय जनता पार्टी) – 93636, (2) पृथ्वीराज गुलाबराव पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस) – 86697, (3) शेखर माने (अपक्ष) – 1739. नोटा – 2448. या मतदारसंघात 186235 मते वैध ठरली तर 305 मते अवैध ठरली.
283-इस्लामपूर – (1) जयंत राजाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) – 115563, (2) निशिकांत प्रकाश भोसले-पाटील (दादा) (अपक्ष) – 43394, (3) गौरव किरण नायकवडी (शिवसेना) – 35668. नोटा – 1196. या मतदारसंघात 198819मते वैध ठरली तर 195 मते अवैध ठरली.
284-शिराळा – (1) मानसिंग फत्तेसिंगराव नाईक (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) – 101933, (2) नाईक शिवाजीराव यशवंतराव (भारतीय जनता पार्टी) – 76002, (3) सम्राट (बाबा) नानासो महाडीक (अपक्ष) – 46239. नोटा – 1417. या मतदारसंघात 227861 मते वैध ठरली तर 277 मते अवैध ठरली.

285-पलूस-कडेगाव – (1) कदम विश्वजीत पतंगराव (इंडियन नॅशनल काँग्रेस) – 171497, (2) संजय आनंदा विभुते (शिवसेना) – 8976, (3) ॲड. प्रमोद गणपतराव पाटील (अपक्ष) – 2132. या मतदारसंघात नोटा पर्यायाला 20631 इतकी लक्षणीय मते मिळाली. या मतदारसंघात 185886 मते वैध ठरली तर 198 मते अवैध ठरली.
286-खानापूर – (1) अनिलभाऊ बाबर (शिवसेना) – 116974, (2) सदाशिवराव हणमंतराव पाटील (अपक्ष) – 90683, (3) श्रावण शंकर वाक्षे (वंचित बहुजन आघाडी) – 2109. नोटा – 2928. या मतदारसंघात 213943 मते वैध ठरली तर 5 मते अवैध ठरली.
287-तासगाव-कवठेमहांकाळ – (1) सुमनवहिनी आर आर (आबा) पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) – 128371, (2) अजितराव शंकरराव घोरपडे (शिवसेना) – 65839, (3) शंकर (दादा) माने (बहुजन समाज पार्टी) – 2320. नोटा – 1744. या मतदारसंघात 199528 मते वैध ठरली तर 114 मते अवैध ठरली.
288- जत – (1) विक्रमसिंह बाळासाहेब सावंत (इंडियन नॅशनल काँग्रेस) – 87184, (2) जगताप विलासराव नारायण (भारतीय जनता पार्टी) – 52510, (3) डॉ. रविंद्र शिवशंकर आरळी (अपक्ष) – 28715. नोटा – 1086. या मतदारसंघात 174339 मते वैध ठरली तर 299 मते अवैध ठरली.