आंवढीत विक्रमदादाच्या विजयचा जल्लोष

0

आंवढी: आवंढीत कॉग्रेसचे विजयी उमेदवार आ. विक्रमसिंह सांवत यांच्या विजयाचा काँग्रेस  कार्यकर्त्यांचा जल्लोष केला.आवंढीतून 476 मतांचे सांवत यांना मताधिक्य मिळाले आहे.आ.विक्रमसिंह सावंत यांना 1012,विलासराव जगताप यांना 536,तर डॉ.आरळी यांना 86 मते पडली.गावातून मिरवणूक काढत विजयी सभा घेण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच डॉ. प्रदिप कोडग म्हणाले, की दादांचा विजय म्हणजे तालुक्यातील जनतेचा विजय आहे,सत्ताधार्यांच्या दबावाला बळी न पडता तालुक्यातील जनतेने विक्रमदादांना भरघोस मतांनी निवडुन दिले.यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, सरपंच आण्णासाहेब कोडग,उपसरपंच आण्णासाहेब बाबर,सदस्य संजय ऐडगे,सतिशभाऊ कोडग,सुरेशभाऊ कोडग,रामचंद्र कोडग,माजी उपसरपंच अनिल कोळी,उद्योगपती दिनेशभाऊ सोळगे,महादेव मरगळे,कृष्णदेव कोडग,डॉ.विश्वास बाबर,महादेव कोडग व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rate Card

आंवढीत आ. विक्रमसिंह सांवत यांच्या विषयाचा जल्लोष करण्यात आला

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.