मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज | शासकीय गोदामात होणार मतमोजणी,20 फेऱ्यानंतर निकाल

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत विधानसभा मतदार संघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून,आज गुरुवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता मतमोजणी सुरू होईल. प्रत्यक्ष मोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल. तहसील कार्यालयासमोरील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशांत आवटे व तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.जत विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख 71 हजार 114 मतदार होते. त्यापैकी एक लाख 73 हजार 926 मतदारांनी मतदान केले आहे. त्याची सरासरी टक्केवारी 64.15 इतकी आहे. गुरुवारी सकाळी प्रारंभी पोस्टल मोजणी

सुरुवातीला पोस्टल मतमोजणी केली जाईल. त्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएमची मतमोजणी केली जाईल.

कोणत्या मतदान केंद्रातील मतमोजणी करावी, यासंदर्भात उमेदवारांची सूचना विचारात घेऊन त्यानुसार रॅन्डम पद्धतीने व्हीव्हीपॅटद्वारे आलेल्या पाच मतदान केंद्रांतील पोहोचपावतीची मतमोजणी होणार आहे.सकाळी सात वाजता 14  टेबलांवर ईव्हीएमची मतमोजणी, दोन टेबलांवर पोस्टल मतदानाची मतमोजणी व चार टेबलांवर इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी, अशा एकूण वीस टेबलांवर 20  फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल.

जत येथील मंगळवारी शासकीय गोदामात मतमोजणीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.