जत | विक्रमसिंह सांवत यांच्या पाच वर्षापासूनच्या प्रयत्नाला मोठे यश

0


जत,प्रतिनिधी : जत विधानसभा निवडणूकीत कॉग्रेस आघाडीचे उमेदवार विक्रमसिंह सांवत सुमारे 34 हजार मताधिक्याने विजयी झाले.गेल्या वेळचा पराभव सहन करून सांवत यांनी कॉग्रेस किंबहुना आपला गट तालुक्यात रुजविला.गेल्या पाच वर्षात सांवत यांनी जिल्हा बँक,जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकत आपले इरादे स्पष्ट केले होते.गत पाच वर्षात दोन्ही पदे व मार्केट कमिटीतील सत्तेमुळे ते कायम जनतेच्या संपर्कात राहिले.त्यामुळे गट मजबूत झाला.ऐन निवडणूकीत भाजपला लागलेले फुटीचे ग्रहण व डॉ.रविंद्र आरळी यांची उमेदवारी थेट सांवत यांचा विजयचा मार्ग सुकर करणारी ठरली.निवडणूक प्रचारातील अर्ज दाखल भरण्याच्या दिवशीची तुफान गर्दी व वेगवेगळ्या माध्यमातून सांवत यांचे नाव व कार्य घराघरात पोहचले.पुर्व भागात कर्नाटकातून प्रत्यक्षात पाणी आणून त्यांची पुजा करण्याचा निर्णय सांवत यांना फलदायी ठरला.आ.विलासराव जगताप यांचा प्रभाव असलेल्या गावात कर्नाटकचे माजी गृहमंत्री एम. बी.पाटील यांच्या सभा व त्यांनी पाणी देण्याचे दिलेले आश्वासन जनतेवर मोठा प्रभाव टाकून गेले.त्यामुळे जगताप यांच्या बालेकिल्यात सांवत मोठे मताधिक्य घेण्यात यशस्वी झाले.नगरपरिषदेच्या नाराजीमुळे जतेत जनाधार घटण्याची शक्यता निवडणूकीपुर्व वर्तवली जात होती. मात्र पुन्हा सांवत यांना जत शहरातील जनतेनी साथ देत विश्वास दाखविला.या उलट आ.जगताप बेफीकीर राहिले.भाजपचा करिष्मा व चाळीस वर्षातील संघटन कामी येईल या आशेवर ते राहिले.दुसऱ्या फळीतील सहा नेते फुटले,बंड करत डॉ.आरळी यांना निवडणूकीच्या रिंगणातही उतरविले.तरीही आ.जगताप विजयाचा दावा करत राहिले.ही बेफीकीरी सांवत यांच्या पथ्यावर पडली.सलग पंधरा वर्षे निवडणूक येत असलेल्या भाजपचा गड पुन्हा कॉग्रेसकडे घेतण्यात त्यांनी यश मिळविले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.