उमदी,वार्ताहर : उमदी ता.जत येथील शिक्षकांच्या पत्नीने किरकोळ कारणावरून घरातील तुळीला गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली आहे.
सविता रमेश सुंट्याळ(वय-36,रा.उमदी) असे मयत पत्नीचे नाव आहे.याबाबत उमदी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी,सविताचे पती रमेश हे प्राथमिक शिक्षक आहेत.ते दोन मुलासह देशमुख बिल्डिंग येथे राहतात.गेल्या तीन दिवसापुर्वी ते निवडणूक कामासाठी तासगाव येथे पत्नीला न सांगता गेले होते.मंगळवारी ते निवडणूकीचे काम संपवून परत आले.त्यावेळी त्यांच्यात व पत्नी सविता यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी झाली.दरम्यान बुधवारी रमेश मुलांना शाळेला सोडण्यासाठी हळगुणकी,ता.इंडी,जि.बिजापूर येथे गेले होते.घरात कोणी नसल्याने सविताने मनास वाईट वाटून स्वंयपाक घरात लोंखडी हुक्काला दोरीने गळपास लावून आत्महत्या केला.पती रमेश घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.याबाबत रमेश सुंट्याळ यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.





