धुळकरवाडीत सख्या भावांचा बुडून मुत्यू | पाण्याच्या जोराच्या प्रवाहातील भौवऱ्यात अडकले : तालुक्यात आतापर्यत 5 मुत्यू

जत,प्रतिनिधी : धुळकरवाडी(लमाणतांडा)ता.जत येथील ओढापात्रात पोहण्यासाठी गेलेल्या लहान मुलांना वाचवितांना पाण्यातील भौवऱ्यात अडकल्याने दोन सख्या भावाचा बुडून मुत्यू झाला.घटना सोमवारी सांयकाळी घडली.संदिप राजू राठोड(वय-18),भारत राजू राठोड(वय-16,दोघे रा.धुळकरवाडी,लमाणतांडा)असे मयत दोन भागाची नावे आहेत.याबाबत उमदी पोलीसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे.
अधिक अशी,गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गावालगतच्या ओढापात्राला पाणी आले आहे.लालसिंग रूपलाल राठोड यांच्या शेततलावा नजिकच्या बंधाऱ्यात संदिप व भारतसह अनेकजण पोहण्यासाठी गेले होते.अन्यही काही तरूण बंधाऱ्यात पोहत होते.दरम्यान एक लहान मुलगा पाण्यात बुडताना संदिप व भारत हे त्याला बाजूला काढण्यासाठी गेले.त्यांनी मुलाला पाण्याबाहेर ढकलेले मात्र बंधाऱ्यांच्या बांधावर गेले.पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ते बंधाऱ्यावरून खाली ओढापात्रात कोसळले.तेथे दोघेही पाण्यातील भौवऱ्यात अडकले,तेथून त्यांना बाहेर येता आले नाही.उपस्थित काही तरूणांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला.काही वेळानंतर त्याचे मृत्तदेह बाहेर काढण्यात आले.उमदी पोलीसांनी घटनास्थंळी पोहचत पंचनामा केला.मृत्तदेहाची उत्तरीय तपासणी करून कुंटुबियाच्या ताब्यात देण्यात आले.आतापर्यत कुणीकोणूर येथील तरूण शेतकरी,कोसारी येथील दोन अल्पवयीन बहिण असे पाण्यामुळे पाच जणाचा मुत्यू झाला आहे.दरम्यान गेल्या पाच वर्षापासून दुष्काळाशी सामना करणाऱ्या या भागात यंदा पावसाने साथ दिल्याने आलेले पाणी जीवघेणे ठरत आहे.राठोड भावांच्या दुर्देव्यी मुत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पाण्यात पोहण्यासाठी जाताना काळजी घ्या
जत पुर्व भागातील अनेक ओढे,बंधारे,नाले,तलाव भरून वाहत आहे.त्यात पोहण्यासाठी जाणाऱ्या तरूणांनी काळजी घ्यावी.अगदीच लहान मुलांनी पाण्याता जाऊ नये, जोराचा प्रवाह असल्यास पाण्यात जाण्याचे धाडस करू नये असे आवाहन उमदी ठाण्याचे सा.पो.निरिक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी केले आहे.
