धाकधूक वाढली | जत विधानसभा, अंदाज येईना

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत विधानसभा निवडणूकीच्या निकालाची तारिख उद्यावर आल्याने उमेदवारांची धाकधुक वाढली आहे.मतदारांचा निश्चित कौल समजत नसल्याने अंदाज करणे अशक्य झाले आहे.घटलेले मतदान तिन्ही उमेदवारांना संधी देणारे आहे.पुर्व भागातील पाणीप्रश्न,जात फँक्टर या निवडणूकीत सर्वाधिक महत्वाचा ठरणार आहे. भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप,कांग्रेसचे विक्रमसिंह सांवत,विकास आघाडीचे डॉ.रविंद्र आरळी अशी तुल्यबंळ लढत झाली.तिघाही उमेदवारांनी सर्व प्रकारे टाईट प्रचार यंत्रणा लावली होती.त्यामुळे तिन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे.तिंरगी तुल्यबंळ लढतीमुळे राजकीय विश्लेषक,जाणकारांनाही निश्चित निकाल लावता येत नसल्याचे वास्तव आहे.अनेक मतदार तिन्ही उमेदवारांच्या बरोबर राहिल्याने त्याचे नेमके मतदान कुणाला झाले आहे.हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र कलाटणी देणारा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तालुक्यात 64.10 इतके लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे.एकूण एक लाख 73 हजार 926 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.अपक्ष व अन्य उमेदवारांची सुमारे 7 ते 8 हजार मतदान वजा जाता उरणाऱ्या मतदानापैंकी तिघांनी मतदारांनी साथ दिली असल्यास 55 -60 हजार मतदान पडलेला उमेदवार विजयी होऊ शकतो.किंवा एकतर्पी निवडणूक झाल्यास विजयासाठी 75 हजार मतदान लागण्याची शक्यता आहे.

वर्षातील कामे,पक्षामुळे आ.जगताप यांना संधी

जत तालुक्यातील किंगमेंकर ते आमदार म्हणून परिचित असलेले भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांचा तालुक्यात प्रभावी गट आहे.त्याशिवाय गेल्या पाच वर्षात सत्ता असल्याने मोठ्या प्रमाणात केलेली विकास कामे आमदार यांची जमेची बाजू आहे.त्याशिवाय जगात वेगळी ओळख निर्माण केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी,व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तरूणात असलेला प्रभाव आ.जगताप यांना विजयाचे गणित बसवताना फायदेशीर ठरत आहे.सर्वाधिक आ.विलासराव जगताप यांना माननारा एक गट याही निवडणूकीत आ.जगताप यांच्या बरोबर कायम राहिला.वयाची साठी ओलांडली असतानाही भाजपने दाखविलेला विश्वास,तरूणांला लाजवेल अशी प्रचार यंत्रणा व तितक्याच तळमळीने कार्यकर्त्यांनी केले काम यामुळे आमदार विलासराव जगताप यांना सर्वाधिक विजयाची संधी आहे.

तरूणांत क्रेज,5 वर्षातील जनसंपर्क विक्रमसिंह सांवतांची जमेची बाजू

तालुक्यातील तरूण,उत्साही उमेदवार म्हणून कॉग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सांवत यांची ओळख या निवडणूकीत घराघरात पोहचली होती.जिल्हा बँक संचालक,जि.प.सदस्य,मार्केट कमिटीच्या माध्यमातून सांवत गतवेळी पराभव होऊनही सतत पाच वर्षे जनतेच्या संपर्कात राहिले आहेत.प्रचारातील आघाडी यामुळे सांवत यांनी नाव व चिन्ह घराघरात पोहचविण्यात यश मिळविले.विद्यमान आमदारांवरील नाराजी,भाजपाअतर्गंत झालेली बंडखोरी यामुळे सांवत यांचा गट अभेध राहिल्याने त्यांनाही विजयाची मोठी संधी आहे. आज ही तालुक्यात त्याचांच विजय होईल अशी चर्चा आहे.

लिंगायत फँक्टर,संघटित प्रचार डॉ.आरळीचा विजय सुकर होण्याचा दावा

लिंगायत फँक्टर,भाजपा बंडखोर,राष्ट्रवादी,जनसुराज्यच्या नेत्यांचा संघटित प्रचार विजयापर्यत नेहणारा ठरणारा आहे.त्यात ऐनवेळी चर्चेत असणाऱ्या वंचित आघाडीचा डॉ.आरळींना मिळालेला पांठिबा जमेची बाजू आहे. भाजपअतर्गंत गटाची छुपी साथ,मोठ्या संख्येने असलेला तालुक्यातील लिंगायत समाज डॉ.आरळी यांच्या बरोबर राहिल्याची चर्चा आहे. 

भाजपचे ब्रेन असलेले माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी आपल्या अनुभवानुसार राबविलेली टाईट प्रचार यंत्रणा महत्वाची ठरली.राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे,मन्सूर खतीब,जनसुराज्यचे बसवराज पाटील,भाजपचे नेते शिक्षण सभापती तम्माणगोंडा रवीपाटील,संजय तेली यांनी एक दिलाने केलेला प्रचार कामी आल्याचे चित्र आहे. त्याशिवाय इतर दोन उमेदवारांपेक्षा स्वच्छ चेहरा यामुळे डॉ.आरळींनाही विजयाची संधी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.