जतमध्ये तिंरगी लढत डॉ.आरळी यांची बंडखोरी कायम : 8 उमेदवार रिंगणात

0

जत,प्रतिनिधी : जत विधानसभा निवडणूकीची लढत निश्चित झाली असून भाजपचे नेते डॉ.रविंद्र आरळी यांनी बंडखोरी केल्यामुळे तिंरगी सामना होणार आहे.भाजपचे विद्यमान आ.विलासराव जगताप, कॉग्रेस विक्रमसिंह सांवत यांच्यात लढत होईल.त्याशिवाय अपक्ष उमेदवार विक्रम ढोणे यांचा फटका कुणाचे गणित बिघडवणार यावरही खल सुरू आहे.

सोमवार ता.7 रोजी अर्ज माघारीच्या दिवशी डमी व काही अपक्ष अशा 21 अर्जापैंकी 13 अर्ज माघारी घेण्यात आले.त्यामुळे तीन प्रमुख उमेदवारासह 8 उमेदवार रिंगणात आहेत.

जत विधानसभा निवडणूकीसाठी भाजप बंडखोराकडून ताकतीने बंड करण्यात आले आहे.गेल्या दोन दिवसापासून बंड केलेले डॉ.रविंद्र आरळी उमेदवारी मागे घेतील अशी अटकळ बांधली होती.भाजपचे उमेदवार आ.जगताप व पक्ष श्रेष्ठीकडून तसे दोन दिवसापासून प्रयत्न करण्यात आले होते.मात्र अखेरपर्यत डॉ.आरळी व तिसऱ्या आघाडीतील नेते ठाम राहिल्याने तुल्यबंळ तिंरगी लढत स्पष्ट झाली.भाजपकडून डॉ.आरळीसह,माजी सभापती प्रकाश जमदाडे, शिक्षण सभापती तम्माणगोंडा रवीपाटील,अँड.प्रभाकर जाधव, शिवाजी ताड यांनी उमेदवारी मागितली होती.मात्र पक्षाने विद्यमान आ.विलासराव जगताप यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज होते.राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे,रमेश पाटील यांनीही राष्ट्रवादीला उमेदवारी देण्याची मागणी केली होती.मात्र कॉग्रेसकडून विक्रमसिंह सांवत यांची घोषणा झाल्याने नाराज राष्ट्रवादीचे नेते,भाजपचे बंड पुकारलेले नेते,जनसुराज्य पक्षाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील,अपक्ष उमेदवार अँड.सी.आर.सांगलीकर यांनी एकत्रित येत जत तालुका विकास आघाडीची स्थापना केली.त्यातून सर्वोनुमते डॉ.आरळी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.मात्र गेल्या दोन दिवसापासून वरिष्ठ पातळीवरून डॉ.आरळी यांच्यावर दबाव वाढला असून ते उमेदवारी मागे घेतील अशी चर्चा होती.मात्र अखेरच्या दिवशी आरळी यांनी अर्ज मागे न घेतल्याने तुंल्यबळ लढत निश्चित झाली आहे.आता भाजपची छुपी रसद कुणाला मिळणार यावरही खल सुरू आहे.

Rate Card

अन्य निवडणूक लढविणारे उमेदवार असे, महादेव हरीचंद्र कांबळे(बसप),दिपक उर्फ व्यंकटेश्वर स्वामीजी गंगाराम कटकधोंड(हिदूस्थान जनता पार्टी),कृष्णदेव धोंडीराम गायकवाड(जनता दल,सेक्युलर),आनंद शंकर नालगे-पाटील(बळीराजा पार्टी)

माघार घेतलेले उमेदवार असे,चंद्रकात सांगलीकर,महादेव हुचगोड,संजयकुमार कोळी,प्रकाश जमदाडे,रमेश पाटील,अकुंश हुवाळे,शरद सरगर,तम्माणगोंडा रवीपाटील, दिनकर पंतगे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.