अशोक बन्नेनवार पुन्हा स्वगृही

0

जत,प्रतिनिधी : बहुजन समाजाची मते विभागून मनुवादी प्रवृत्तीची लोक पुन्हा सत्तेत येऊ नयेत म्हणून मी वंचित आघाडीचा उमेदवारीचा फॉर्म न भरता कॉंग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांच्या बरोबर राहण्याचे ठरविले असल्याचे प्रतिपादन जत मधून वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळालेले उमेदवार अशोक बन्नेनावर यांनी जत येथील पत्रकार बैठकीत सांगितले. 

Rate Card

जत तालुक्यात येत्या दोन दिवसात अनेक घडामोडी घडल्या. विकास आघाडीच्या बैठकीला मी गेलो होतो. त्यांना मी वंचितकडून उमेदवारी घ्या, असे सांगितले होते. मात्र त्यांनी वंचितची उमेदवारी घेण्यास नकार दिला. ते निवडून आल्यावर भाजपाला पाठिंबा देऊ, असे सांगितले.भाजपा हा पक्ष मनुवादी पक्ष असल्याने त्यामुळे आम्ही या बैठकीतून बाहेर पडलो. त्यामुळे भाजपा पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विक्रम सावंत यांच्या पाठीशी राहण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात मी पक्षश्रेष्ठीशी दोन दिवसांपूर्वीच बोललो आहे. विक्रम सावंत हे चांगले नेतृत्व आहे.माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. कार्यकर्तेही विक्रम सावंत यांच्या पाठीशी राहून त्यांचा प्रचार तनमनाने करतील, असा विश्वास बन्नेनावर यांनी व्यक्त केला.

जत तालुका वंचित आघाडीचे अशोक बन्नेनवार यांनी कॉग्रेसला पांठिबा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.