आ.जगताप,विक्रम सांवत सोशल मिडियावर सोशल चर्चेत

0

जत : जत तालुक्यातील विधानसभा निवडणूकीचे वातावरण ढवळून निघाले आहे.भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचे तिकिट कापल्याचे वृत्त असल्याची सकाळ मधील बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली.

Rate Card

दुसरी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची शुक्रवारी बैठक झाल्यानंतर आता काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीतली नावं बाहेर आली आहेत.यात जतसाठी 

विक्रमसिंह सांवत या नेत्यांचा समावेश आहे.या दोन्ही बातम्यांनी जत तालुक्यातील राजकीय गोटात खळबंळ उडाली आहे.भाजपमधून विद्यमान आमदार विलासराव जगताप प्रमुख दावेदार आहेत.त्यातच भाजपमधून बंड केलेले प्रकाश जमदाडे, डॉ.रविंद्र आरळी यांना उमेदवारी मिळण्याची काही दिवसापासून हवा आहे.त्यातच शुक्रवारी आमदार विलासराव जगताप यांची तिकीट उडविण्याची शक्यता व्यक्त करणाऱ्या सकाळच्या बातमीने चर्चेला सुरूवात झाली.त्यांचबरोबर कॉग्रेसचे नेते विक्रम सांवत यांची उमेदवारी निश्चित झाल्याची यादी सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने कॉग्रेसच्या गोटात आंनदी वातावरण पसरले होते.मात्र दोन्ही बाबतीत पक्षाकडून अधिकृत्त काहीही माहिती अद्याप बाहेर आलेली नाही.त्यामुळे अजून चार दिवसात काहीही घडू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.