दिवसाढवळ्या विधवा महिलेवर बलात्कार | जतेत खळबंळ I 10 पथकाद्वारे तपास सुरू

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या बिसल सिद्राया देवस्थानपुढील पवनचक्कीसाठी केलेल्या रोडवर चाकूचा धाक दाखवून 50 वर्षीय महिलेवर दिवसाढवळ्या बलात्कार करून 50 हजार रूपयाचे सोने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. 

गुरूवारी सकाळी 12 च्या सुमारास घडलेल्या घटनेची नोंद जत पोलीसांनी मध्यरात्री करून घेतली आहे.त्यानंतर पोलीसांची सुमारे दहा पथके वेगवेगळ्या

भागात तपास करत आहेत.शुक्रवारी पोलिस अधिक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले जतेत तळ ठोकून होते.सुमारे दहा पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील एका गावातील विधवा पिडिता निगडी रोडवरील एका देवाच्या दर्शनासाठी आली होती.दर्शन आटपून ती जतला येण्यासाठी येळवी-जत रोडवर थांबली होती.त्यात रस्त्यावरून चाललेल्या एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडी चालकांनी गाडी थांबवत जतला चाललोय येताय काय म्हणत,त्या पिडितेला गाडीत बसविले.निगडीपासून पुढे तीन-चार किलोमीटर वर असलेल्या सिद्राया मंदिरापासून पुढे पवनचक्कीसाठी केलेल्या रस्त्यावरून गाडी पुढे नेहली.पिडितीने विरोध केल्यावर चाकूचा धाक दाखविण्यात आला.काही अंतरावर पुन्हा चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार केला.अंगावरील चेन,कानातील सुवर्ण फुले,बुगड्या असे 50 हजार रूपये किंमतीची सोन्याचे दागिणे काढून घेत तेथून संशयिताने पलायन केले.महिलेला येथून पुढे अचकनहळ्ळीला जायाचे नाहीतर ठार मारून टाकीन म्हणून धमकाविले. महिलेने कसेबसे जतला पोहचत जत पोलीसात धाव घेतली.अचानक उद्भवलेल्या प्रंसगामुळे महिलेला मोठा धक्का बसला आहे.तिला पांढऱ्या रंगाची गाडी व चाकू दाखवून धमकावत अचकनहळ्ळी जायाचे एवढेच सांगता येत आहे. दरम्यान दुपारी घडलेला घटनेचा पोलीसानी शोध सुरू केला.रात्री उशिरापर्यत काहीही हाती न लागल्याने ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.मात्र दिल्ली,मुंबई सारख्या घटनेची पुर्नावर्ती जत तालुक्यात घडल्याने पोलीसाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गुरूवारी झालेल्या तपासात पोलीसांना शोध लागला नाही.शुक्रवारी अधिक्षक, अप्पर अधिक्षक, डिवायएसपी तपासाच्या सुचना देत होते.स्थानिक गुन्हे अन्वेषण,टसे तज्ञ,गुंडा विरोधी पथक,साइबर क्राइम, जत,कवटेमहांळ, उमदी ठाण्यातील सुमारे दहा पथके वेगवेगळ्या भागात आरोपी़चा शोध घेत आहेत.आरोपीने वापरलेली चारचाकी वाहन कोठून गेले यांचे वाटेवरील रस्त्यावर असणाऱ्या दुकानातील सीसीटिव्ही फुटेज 

तपासण्यात येत आहे. त्याशिवाय परिसरातील मोबाइल लोकेशनचाही वापर करण्यात येत आहे. दरम्यान ऐन निवडणूकीत घडलेल्या या घटनेने पोलिस यंत्रणा हडबडून जागी झाली आहे.प मोठ्या संख्येने पोलिस यंत्रणा तपासाच्या कामात गुंतली आहे.

कायदा-सुव्यवस्था बिघडली

विभागीय पोलीस अधिकारी, अधिकाऱ्यांचा भला मोठा ताफा असूनही शहरात गुंडाराज वाढले आहे.अवैध धंद्यातील बरकतीला पोलीस दल चाटावल्याने सगळीकडे कायदा-सुव्यस्थेचा बाजार मांडल्याचे चित्र आहे. दिवसाढवळ्या काही तरूण तलवारी घेऊन दहशत करतात.मटका,जुगार,दारू,अगदी शस्ञे विक्रीपर्यत उघड्यावर घडत असतानाही पोलीसाची त्याकडे नजर जात नाही.सर्वांना हप्त्याची चटक लागल्याने तालुक्यातील महिला,नागरिकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.हे पोलीसाचे अपयश ठरत आहे.

अनेक घटनाचे तपास रखडले

वज्रवाड ता.जत येथे एका शाळकरी मुलीच्या खूनाचा तपास अद्याप लागलेला नाही.त्याशिवाय व्हसपेठच्या डोंगरावर एका महिलेचा मृत्तदेह आढळून आला होता.त्यांचाही अद्याप थांगपत्ता नाही.अशा अनेक महिला अत्याचारांच्या घटनेचे तपास रखडल्याने गुन्हेगारांचे बळ वाढले आहे.महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक असतानाही शाळकरी मुली सुरक्षित नाही.विद्यालयाच्या परिसरात टवाळखोर मंजनूचा वापर नेमके पथक कशासाठी आहे,असा प्रश्न निर्माण करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.