मोहन माळी स्कूलचा स्केटिंग संघ राज्यात प्रथम | 3 सुवर्ण,4 रौप्य,3 कांस्य पदाची कमाई

0

कवठेमहांकाळ :  मोहन माळी इंटरनँशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रथम चँम्पियनशीप पटकावली.त्यात 3 सुवर्ण, 4 रौप्य,3 कांस्य पदके मिळवित स्कूलचा दबदबा कायम ठेवला.

Rate Card

52 वी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा औरंगाबाद येथे रविवारी पार पडली.रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र औरंगाबाद जिल्हा रोलर रिले स्केटिंग असोसिएशनतर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत स्कूलचा विद्यार्थी वरद अरविंद भोसले याने एक सुवर्णसह रौप्य पदक पटकावत सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.समर्थ शिवाप्पा स्वामी याने रौप्यसह कास्य,सुरज विजय ठेंगील याने सुवर्णसह कास्य,सुमित गजानन ओलेकर याने सुवर्णसह रौप्य,संस्कार सचिन शिंगे याने रौप्यसह कांस्यपदक पटकाविले. 

या चमकणाऱ्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम स्केटिंग प्रशिक्षक अजित पाटील यांनी केले.संस्थापक मोहन माळी,प्राचार्य व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

मोहन माळी इंटरनँशनल स्कूलच्या स्केटिंग मधील चैम्पियन संघ ट्रॉफी स्विकारताना

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.