निवडणूकीनंतरही पाण्यासाठी संघर्ष शक्य | प्रांताधिकारी प्रंशात आवटे : निवडणूक बहिष्कारांवर शेतकरी ठाम

0

संख,वार्ताहर : निवडणूकीत बहिष्कार घालणे अयोग्य आहे.आपल्या मागण्यासाठी निवडणूकीनंतरही संघर्ष करणे शक्य आहे.निवडणूकीवर बहिष्कार व बहिष्कारांसाठी दबाव टाकणे कायद्याने गुन्हा आहे.त्यामुळे कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका,असे आवाहन प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी केले

संख ता.जत येथे परिसरातील म्हैसाळ पाण्यासाठी बहिष्कार घातलेल्या गावातील लोकप्रतिनिधीची बैठक संपन्न झाली.त्यावेळी प्रांताधिकारी आवटे बोलत होते. 

प्रांताधिकारी आवटे म्हणाले,प्रशासनाकडून या भागातील पाणी मागणीची माहिती वरिष्ठ पातळीवर पोहचवली आहे.तो राज्य पातळीवरचा विषय आहे.त्यासाठी आवश्य पाठपुरावा करावा.सध्या दुष्काळी उपाययोजना आम्ही देत आहोत.अजूनही जादा टँकर,छावण्या देऊ,मात्र निकोप लोकशाहीसाठी मतदान व्हावे,नाटोसारखा पर्याय उपलब्ध आहे.निवडणूकीवर बहिष्कार टाकणे कायद्याने गुन्हा आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधी, नागरिकांनी निवडणूक यंत्रणेस मदत करावी.

शेतकरी चंद्रशेखर रेबगोंड संख म्हणाले की,दरवर्षी आम्हाला शासनाच्या मदतीवर जगावे लागत आहे.शासन,निसर्ग आम्हाला सावत्र भावासारखे वागवत आहे.त्यामुळे आम्हाला एकतर पाणी द्या,अन्यथा कर्नाटकात जायाला परवानगी द्या.शासन आमच्या मागणीची दखल घेत नाहीतोवर आमचा बहिष्कारांचा निर्णय ठाम आहे.  

मोहनराव गायकवाड म्हणाले,शेतकऱ्यांचा मुत्यू झाल्यावर मदत देण्यापेक्षा आगोदर मदत द्या.बँका आम्हाला कर्ज देत नाहीत.आम्ही संपलोय आता हा शेवटचा संघर्ष असेल.

Rate Card

मुतू वडीयर म्हणाले,लोकसभा निवडणूकी पुर्वी म्हैसाळ विस्तारित योजनेचे गाजर दाखविण्यात आले.मतदान झाल्यावर इकडे कोणही फिरकले नाही.मुख्यमंत्री ही आमच्यावर अन्याय करत आहेत.

यावेळी भिमाशंकर बिरादार,प्रलाद जोशी,काशिराया रेबगोड,संचिन राठोड,सुरेश कटरे,अमशीद बिरादार आदी शेतकरी व संखसह, अंकलगी,तिकोंडी, लमाणतांडा, तिल्याळ, सोरडी, करेवाडी कोबो, दरीबडची,भिवर्गी, गोंधळेवाडी सोन्याळ,जाल्याळ या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला गोळ्या घाला

आम्ही सत्तर वर्षापासून पाणी मागत आहोत.आमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन राजकर्ते आम्हाला खेळवत आहेत. निसर्गाची अवकृपा आहेच,त्याशिवाय आमचे पालकत्व असणारे शासन आम्हाला भिक मागायला लावत आहे.आता  एकतर पाणी द्या नाहीतर आम्हाला गोळ्या घाला,आम्ही या निवडणूकीवर बहिष्कार घालणारचं असे ठाम मत दरिबडचीचे गंगाधर मोर्डी यांनी मांडले.यावेळी निवडणूक प्रांताधिकारी आवटे,अप्पर तहसिदार प्रशांत पिसाळ, नायब तहसिदार श्री.विभुते उपस्थित होते.

संख येथील बैठकीत बोलताना प्रांताधिकारी प्रंशात आवटे 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.