दुष्काळावर मात करण्यासाठी युवकांची साथ हवी | उमदीत विक्रमसिंह सावंत यांनी साधला युवकांशी खुला संवाद !

0

उमदी,वार्ताहर : जतच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा पाणी असून, पाणीच जतच्या तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवेल,

पाणी प्रश्न सोडविण्यासाठी युवकांनी साथ द्यावी असेे प्रतिपादन कॉग्रेस नेते विक्रमसिंह सावंत यांनी केले.

सांवत यांनी सुरू केलेल्या युवा संवाद मोहिमेअतर्गत उमदी ता.जत येथे युवकांशी संवाद साधला.

सांवत म्हणाले,जतच्या भविष्यासाठी तरूणांची साथ  हवी आहे,असे म्हणत त्यांनी तरूणांना बोलते केले. 

Rate Card

ते म्हणाले, “तूम्ही बोला,प्रश्न मांडायला शिका,तूमच्या सूचना,कल्पना आणि सल्ला जतचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त आहेत.आपला तालुका दुष्काळमुक्त करण्याच्या विचारानेच मी राजकारणात आलोय.”

व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या तरूणांना रोजगार मिळाय पाहिजे.यासाठी उद्योग उभारणीस प्राधान्य आहेच.मात्र हे पाण्या शिवाय शक्य नाही. लवंग्या जवळ ‘धानम्मादेवी शुगर प्रा.लि.ची मंजूरी देखील आणली आहे.पण शेवटी पाण्यापाशी येऊन घोडं अडतय,पाणी आले,तरच बाहेरचे उद्योग जतला येतील.

भविष्यात जत पूर्व-पश्चिम कनेक्टीविटी आणि इतर मुख्य शहराशी जतला जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही सांवत यांनी सांगितले.

गल्लीपासून – दिल्लीपर्यत सत्ता असून ही विरोधकांना जतला पाणी आणता आलं नाही. तुकाराम महाराजानी पाण्यासाठी मोर्चा काढला.पण सरकार दरबारी त्यांना प्रवेश देखील मिळाला नाही,हे जतचं दुर्देव्य आहे.त्यामुळे सरकारला आपली ताकत दाखविण्याची खरी गरज आता आहे.युवकांची साथ जत बदविण्यासाठी मला मिळावी असेही सांवत शेवटी म्हणाले, या युवासंवादाला तरूणांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी सांगली माजी सभापती संतोष पाटील,निवृत्ती शिंदे,सुरेश कोहळळी,रमेश हळके, संतोष आरकेरी,वहाब मुल्ला,बंडू शेवाळे, जोतिबा शेवाळे आणि नारायण ऐवळे यासह दादाप्रेमी अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

उमदी ता.जत येथे युवा संवाद कार्यक्रमात बोलताना विक्रमसिंह सांवत

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.