निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करा : प्रांताधिकारी

0

जत,प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक काळात आदर्श आचारसहितेचे काटेकोर पालन करा,कोणत्याही प्रकारे  परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था बिघडू नये,असे आवाहन प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी पत्रकार बैठकीत केले.यावेळी तहसीलदार सचिन पाटील,विभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत व सर्व विभागाचे विभागप्रमुख,लोकप्रतिनिधी उपस्थित होते.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जत तहसील कार्यालयात  लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ,पदाधिकारी, विभाग प्रमुख यांची बैठक संपन्न झाली.आवटे म्हणाले, निवडणूक मग ती ग्रामपंचायतीची असो किंवा विधानसभेची; टीका, आरोप-प्रत्यारोप तर होतातच! पण, प्रचारादरम्यान एकमेकांची उणीदुणी काढताना काही पथ्यं प्रत्येक उमेदवाराने आणि नेत्याने पाळणं बंधनकारक असतं. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत कसं वागायचं, कसं बोलायचं, याचे जे नियम निवडणूक आयोगाने तयार केले आहेत, तीच आचारसंहिता. म्हणजेच,निवडणुका मुक्त आणि पारदर्शकपणे व्हाव्यात, या हेतूने ही मार्गदर्शक तत्त्वं ठरवण्यात आली आहेत.त्याचे सर्वांनी पालन करावे.आवटे म्हणाले,विधासभेला एकूण 2 लाख 71 हाजार 551 मतदार त्यात पुरुष 1 लाख 44 हजार 579,महिला 1 लाख 26 हजार 466 इतर 6 मतदार आहेत.यातिल 99 टक्के मतदारांना ओळखपत्राचे वाटप कऱण्यात आले आहे.त्यामुळे बोगस मतदानांला आळा बसणार आहे.सर्व यंत्रणेच्या बैठका घेऊन सुचना,मार्गदर्शन करण्यात आले आहेत.सोशल मिडियावर लक्षविधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे सोशल मिडियावर विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी वेगळा विभाग त्यावर लक्ष ठेऊन असणार आहे.अपेक्षार्य,वादग्रस्त मजकूर टाकल्यास कारवाई करण्यात येईल असेही प्रांताधिकारी आवटे म्हणाले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.