आचारसंहिता लागताच पोलीसांना अवैध वाहने दिसली | अडथळा करणाऱ्या दोन वाहनावर कारवाई

0

Rate Card

उमदी,वार्ताहर : उमदी पोलीस ठाणे हद्दीतील उमदी, संख येथील वेगवेगळ्या ठिकाणी रहदारीच्या रस्त्यावर वाहने उभी करून अडथळा निर्माण करीत असल्याबद्दल दोन वाहनावर उमदी पोलीसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाने ही कारवाई केली.विधानसभेची आचारसंहिता लागताच पोलीसांना अडथळा करणारी वाहने दिसली आहेत

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,आज सकाळी उमदी पोलिसांकडून सकाळचे पेट्रोलिंग करते वेळी संख येथे बाळासो विठोबा करांडे यांच्या मालकीचा अपे रिक्षा क्रमांक एमएच-10,एजी-5692 हे रस्त्यावर उभा करून वाहतूकीस अडथळा करीत होता.तर उमदी येथेही श्रीधर शिवापा धुमगोंड यांच्या मालकीची कुझर(केए-28,एन-5214)उमदी बस स्थानक परिसरात रस्त्यावर उभी करून अडथळा आणला,म्हणून या दोन वाहनावर गुन्हा दाखल करून वाहने ताब्यात घेतले आहे.  

आताच बेकायदा वाहनावर कारवाईचे गौडबंगाल 

उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाहन व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. महिन्याला एक लाल पत्ती दिली की काही करा,असा काहीसा प्रकार पोलीसाकडून चालत असल्याचे आरोप आहेत.त्यामुळे मुदार्ड झालेले वाहन चालक थेट रस्त्यावर वाहने उभी करून अडथळा निर्माण करतात.आचारसंहिता सुरू झाल्यावर उमदी पोलीसांना बेकायदा वाहने रस्त्यावर अडथळा करत असल्याचे दिसल्याने कारवाई करण्यात आली आहे.कारवाईतही हप्तेबाजीचा वास असल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.