धनगर समाजाला आरक्षणाचा विषय अंतिम टप्यात ना.महादेव जानकर : जतेत रासपचा मेळावा संपन्न

0

जत,प्रतिनिधी : राज्य शासनाने मराठा आरक्षण दिलेले आहे,त्यात माझी महत्वपुर्ण भूमिका होती.धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय भाजप सरकारच घेईल.त्यामुळे आम्ही भाजपला साथ देत आहोत.विधानसभा निवडणूकीनंतर तो विषय पुर्ण होईल,स्थानिक स्वराज्य संस्थेत आपला प्रतिनिधी पाहिजे,पक्ष वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले.जत येथे रासपचा मेळावा संपन्न झाला.त्यावेळी ना.जानकर बोलत होते.वेळी शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे,प्रदेशाध्यक्ष ताजुद्दीन मणेर,

Rate Card

महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष श्रध्दाताई भातांब्रेकर,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील,प्रदेश सचिव नितीन धायगुडे,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश कचरे,जिल्हाध्यक्ष शिल्पा जाधव

माजी जिल्हाध्यक्ष अजितराव पाटील,जिल्हाध्यक्ष मारूती सरगर,किसन टेंगले,भूषण काळगी,अखिल नगारजी,ओंकार बंडगर,धनाजी मोटे,भाऊ खरात हे प्रमुख उपस्थित होते.

ना.जानकर म्हणाले,समाजाला आपण स्वाभिमान शिकवला आहे.तिकीटासाठी भिक मागत नाही.आम्हीच आता तिकिट देतो.देशभर संघटन मजबूत केले आहे. एनडीए मध्ये घटकपक्ष म्हणून सन्मानाची वागणूक दिली आहे. ज्या मत दार संघात भाजपा सेनेचे आमदार आहेत त्या ठिकाणी आमची मागणी नाही.पंरतू महायुतीमधून काही जागा मागणार असून त्या लढविणार आहे. पुढच्या वेळी मी केंद्रात मंत्री असेन बाळासाहेब दोडतले हे राज्यात मंत्री असतील.जतमध्ये मी रासपच्या माध्यमातून सगळ्यात मोठे काम केले आहे. कुठल्या गावात गोलो नाही असे नाही.मात्र तालुक्यात एक ही जिल्हा परिषद, पंचायत समितीत एकही सदस्य निवडून येऊ शकला नाही.याची खंत मला आहे.असेही शेवटी जानकर म्हणाले,अजित पाटील म्हणाले,साहेबाच्या मुळे समाजात जागृति झाली.साहेबानी आम्हाला स्वाभिमान शिकवला.आता पक्षाची ताकत वाढली आहे.येत्या विधानसभेला जतची जागा सोडावी अशी मागणी केली.यापुढे जिल्ह्यात रासपचे विचार तळागाळा पर्यत पोहचवून पक्ष वाढवू,मारूती सरगर म्हणाले,रासपला मिळालेल्या पशु संवर्धन व दुग्ध विकासच्या खात्याच्या माध्यमातून जानकर साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.मेळाव्यास तालुक्यातील मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.

जत येथील रासपच्या मेळाव्यात बोलताना पशूसंवर्धन मंत्री ना.महादेव जानकर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.