दिवाळीपुर्वीच नवा मुख्यमंत्री | 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी |

0

सांगली : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहिता आज दिनांक 21 सप्टेंबर 2019 पासून लागू झाली आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान तर 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसार माध्यमांसोबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, 282-सांगली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसुंधरा बारवे, निवडणूक खर्च संनिंयंत्रण समितीचे नोडल अधिकारी राजेंद्र गाडेकर, अविनाश जाधव, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे आदि उपस्थित होते.

      विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. अधिसुचनेची प्रसिध्दी दि. 27 सप्टेंबर 2019, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख दि. 4 ऑक्टोबर 2019, नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 5 ऑक्टोबर 2019, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख दि. 7 ऑक्टोबर 2019, मतदानाची तारीख दि. 21 ऑक्टोबर 2019, मतमोजणीची तारीख दि. 24 ऑक्टोबर 2019, निवडणूक समाप्तीची तारीख दि. 27 ऑक्टोबर 2019.

      सांगली जिल्ह्यात एकूण मतदार 23 लाख 74 हजार 374 इतके मतदार असून यामध्ये पुरूष मतदार 12 लाख 21 हजार 213 तर स्त्री मतदार 11 लाख 53 हजार 86 व तृतीयपंथी मतदार 75 आहेत. तसेच सैनिक मतदार 7 हजार 870 असून यामध्ये पुरूष मतदार 7 हजार 750 तर स्त्री मतदार 120 आहेत.

      विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार संख्या पुढीलप्रमाणे आहे. 281-मिरज (अ.जा.) – 3 लाख 25 हजार 445 (पुरूष 166976, महिला 158453, तृतीयपंथी 16), 282-सांगली – 3 लाख 23 हजार 646 (पुरूष 164528, महिला 159085, तृतीयपंथी 33), 283-इस्लामपूर – 2 लाख 70 हजार 573 (पुरूष 138163, महिला 132410), 284-शिराळा – 2 लाख 91 हजार 213 (पुरूष 149607, महिला 141605, तृतीयपंथी 1), 285-पलूस-कडेगाव – 2 लाख 77 हजार 593 (पुरूष 140027, महिला 137561, तृतीयपंथी 5), 286-खानापूर – 3 लाख 22 हजार 179 (पुरूष 166586, महिला 155585, तृतीयपंथी 8), 287-तासगाव-कवठेमहांकाळ – 2 लाख 92 हजार 674 (पुरूष 150747, महिला 141921, तृतीयपंथी 6), 288-जत – 2 लाख 71 हजार 51 (पुरूष 144579, महिला 126466, तृतीयपंथी 6).

Rate Card

      जिल्ह्यात 2405 मतदान केंद्रे व सहाय्यकारी 30 मतदान केंद्रे अशी एकूण 2 हजार 435 मतदान केंद्रे आहेत. संवेदनशिल मतदान केंद्रे 29 आहेत, शॅडो एरिया पी.एस. 4 व महिला कर्मचारी संचलित 8 मतदान केंद्रे आहेत. सर्व मतदान केंद्रावर आश्वासीत किमान सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.  आवश्यक ईव्हीएम, व्हीव्हीपॅट उपलब्ध असून प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली आहे. दिनांक 31 ऑगस्ट 2019 पासून जिल्ह्यात ईव्हीएम, व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दिनांक 20 सप्टेंबर 2019 अखेर एकूण 1153 ठिकाणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले असून 52 हजार 19 लोक सहभागी झाले आहेत. टपाली मतपत्रिकेसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ स्तरावर कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

      जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, व्हीव्हीटी 16, एसएसटी 42, व्हीएसटी 36, एफएसटी 51 अशा एकूण 145 पथकाव्दांरे आचारसंहितेच्या अंमलबजावणीकामी नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर तसेच विधानसभा मतदारसंघ निहाय सी-व्हीजील कक्ष स्थापन करण्यात आला असून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. जिल्हात सर्व तालुक्यात मतदार मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरावर मतदार मदत केंद्र स्थापन करण्यात आले असून टोल फ्री क्रमांक-1950 हा कार्यान्वीत करण्यात आला आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट साठवणुकीसाठी सुसज्ज स्ट्राँग रूम तयार ठेवण्यात आले आहेत. मतदान कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी सर्व सोयी सुविधा असलेली ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, मतदान केंद्र निहाय आराखडा, वाहतुक आराखडा, दळणवळण आराखडा ईत्यादी आराखडे परिपूर्ण तयार करून ठेवण्यात आले आहेत. जनजागृती व प्रसारासाठी जिल्ह्याचा स्वीप आराखडा तयार करण्यात आला आहे.

शेवटच्या 48 तासांमध्ये सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये पत्रकार परिषदा वा निवडणूकीशी संबंधित मुलाखती देवू नयेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी गुन्ह्यासंबंधित माहिती वृत्तपत्रे व टी.व्ही. चॅनेल्सव्दारे प्रचार कालावधीत तीन वेळा प्रसिध्द करावी. तसेच अशा उमेदवाराची त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत त्यांच्या राजकीय पक्षाने त्यांच्या पक्षाच्या वेबसाईट, वृत्तपत्रे व टी.व्ही. चॅनेल्स याव्दारे प्रसिध्द करावी. पर्यावरण पुरक निवडणुकीसाठी निवडणूक प्रचार सामग्रीमध्ये प्लास्टिकचा वापर करू नये. पर्यावरण व मानवी आरोग्य यांच्या हितसंवर्धनासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा. नामनिर्देशन पत्र व प्रतिज्ञापत्राच्या नमुना 26 मध्ये सुधारणा झाल्या असून सुधारीत नामनिर्देशनाची प्रत कमिशनच्या वेबसाईट https://eci.gov.in वर फॉर्म आणि प्रतिज्ञापत्र उपलब्ध आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

एकूण 8 विधानसभा मतदारसंघासाठी 8 निवडणूक निर्णय अधिकारी व प्रत्येक मतदार संघासाठी 03 असे एकूण 24 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत ते पुढीलप्रमाणे कंसात संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे. 281-मिरज – उपजिल्हाधिकारी (रोहयो) विवेक आगवणे (0233-2373707, 9422400073), 282-सांगली – जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे (0233-2373512, 9860653184), 283-इस्लामपूर – उपविभागीय अधिकारी इस्लामपूर नागेश पाटील (02342-225673, 9850504189), 284-शिराळा – उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अरविंद लाटकर (0233-2376019, 9822462307), 285-पलूस-कडेगाव – उपविभागीय अधिकारी कडेगाव गणेश मरकड (02347-242624, 7741931284), 286-खानापूर – उपविभागीय अधिकारी विटा शंकर बर्गे (02347-272777, 8788338842), 287-तासगाव-कवठेमहांकाळ उपविभागीय अधिकारी मिरज समिर शिंगटे (0233-2222683, 9423041444), 288-जत – उपविभागीय अधिकारी जत (02344-246134, 9823426060). अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.