जत तालुक्यात 300 रस्ते केले | आ.विलासराव जगताप : आंवढी ते जाधववाडी(सोंनद)रस्ता कामाचा शुभारंभ |

0
Rate Card

आंवढी,वार्ताहर : जत तालुक्यात 300 कोटीचे रस्ते केले आहेत.त्यांतून श्रेय अथवा महत्व वाढवावे म्हणून केले नाहीत.तालुक्याचा विकास झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत आहे,असे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी केले.

आंवढी ता.जत येथील आंवढी ते (जाधवस्ती)सोंणद रस्ता काम व बाळूमामा मंदिराच्या सभामंडपाच्या कामाचा शुभारंभ आ.जगताप यांच्याहस्ते झाला.

यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जि.प.सदस्य सरदार पाटील,सुनिल पवार,आंवढी सोसायटीचे चेअरमन माणिक पाटील,जांबुवंत कोडग,बबन कोडग,ग्रा.प.सदस्य लालासो देशमुख,सुभाष कदम,विलासदादा,अरूण कोडग व ग्रामस्थ उपस्थित होते.

आ.जगताप म्हणाले,हा रस्ता पंतप्रधान सडक योजना व बाळूमामा मंदिराचे काम आमदार फंडातून मंजूर झाले आहे.दरवर्षी मुख्यमंत्री सडक योजनेतून 20 कोटीचा निधी तालुक्याला मिळतो,ते व अन्य योजनातून आतापर्यत तालुक्यात 300 कोटीचे रस्ते झाले आहेत.

ज्यांनी काम केले त्यांनी श्रेय घ्यावे,मी आमदार म्हणून जत तालुक्यासाठी सरकारकडून निधी खेचून आणला आहे.मात्र मी काम केलय म्हणून दिशाभूल करणे योग्य नाही असेही शेवटी जगताप म्हणाले.

आंवढी ते जाधववाडी(सोंनद)रस्ता कामाचा शुभारंभ आ.विलासराव जगताप यांच्याहस्ते झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.