आ.विलासराव जगताप यांच्या प्रयत्नातून | जतेत 2 कोटीच्या रस्ते कामाचे उद्घाटन |

0

जत,प्रतिनिधी : जत शहरातील खड्डमुक्त रस्त्यासाठी आ.विलासराव जगताप धावले आहेत.त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या दोन कोटीच्या विविध रस्ता कामांचा शुभारंभ प्रभाग 3,4,8,9 मध्ये करण्यात आला.जत शहरातील रस्त्याची अवस्था बकाल झाली आहे.नगरपरिषद स्थापनेनंतर पाच वर्षात रस्ता कामे झाली नाहीत.त्यामुळे दीड वर्षापुर्वी झालेल्या नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीत शहराला विकासाच्या प्रवाहात आणू असे आश्वासन आ.जगताप यांनी दिले होते.त्याला जतच्या नागरिकांनी भरभरून यश दिले.एक दोन नगरसेवक निवडून येणाऱ्या आ.जगताप गटाचे सात नगरसेवक विजयी झाली.नगराध्यक्ष पदाचे उमेदवार थोड्या मतात पराभूत झाले.मोठे यश मिळाल्याने आ.जगताप यांनी शहरात विशेष लक्ष घातले आहे.हायमस्ट टॉवर,अंतर्गत रस्त्यासाठी त्यांनी मोठा निधी आणला आहे.शहरातील प्रमुख विजापूर-गुहागर महामार्गाचेही काम गतीने करण्यासाठी आ.जगताप सतत पाठपुरावा करत आहेत.शहरातील नागरिकांनी खड्डेयुक्त रस्त्यातून सुटका करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.त्या पार्श्वभूमीवर दोन कोटीच्या रस्ते मंंजूर करण्यात आले आहेत.यात प्रभाग 9 मधील बिरोबा मंदिर ते रफिक अलगूर रस्ता डांबरीकरण, मंहमद अलगूर घर ते संतोष माने घर रस्ता कॉक्रिटीकरण,दुर्योधन कोडग ते शहाजी भोसले रस्ता गटार व रस्ता कॉक्रीटीकरण,प्रभाग 4 : वासुदेव सांळुखे घर ते सुप्रित मोदी घर रस्ता कॉक्रीटीकरण एका बाजूचे गटार,बसवेश्वर मंदिर ते भारत कलाल दुकान रस्ता डांबरीकरण,बाबूराव पट्टणशेट्टी घर ते संजू कोळी घर रस्ता डांबरीकरण,

प्रभाग 8 : ईदगाह मैदान ते घाडगेवाडी रोडपर्यत डांबरीकरण व एका बाजूचे गटार,ईगल अँटोमोबाई ते साळुंखे घर दोन्ही बाजूचे गटार व डांबरीकरण प्रभाग 3 : शालीवहन पट्टणशेट्टी हॉस्पिटल ते कोळी समाज मंदिर दोन्ही बाजूचे गटार व डांबरीकरण, मोदी हॉस्पिटल ते महेश जाधव घर रस्ता कॉक्रीटीकरण,हॉटेल महाराष्ट्र ते सवदे खत दुकान डांबरीकरण, वाघ हॉस्पिटल ते गणपती मंदिर उमराणी रोड रस्ता डांबरीकरण करणे आदीचा समावेश आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.