पुर्व भागातील पाण्यासाठी कोणत्याही निर्णयाला तयार : अँड.सी.आर.सांगलीकर

0

संख,वार्ताहर : जत पूर्व भागातील शेतकऱ्यांनी हभप तुकाराम बाबा महाराज यांचे पुढाकाराने येत्या  निवडणुकीवर बहिष्कार घालायचे ठरवले अथवा कोणत्याही उमेदवाराने विधानसभेसाठी निवडणूक लढवू नये, अशी भूमिका घेतली तर निवडणूकी पेक्षा येथील जनतेच्या निर्णयाला पाठिंबा देणार असल्याचे भूमिका जत विधानसभेसाठी इच्छुक असणारे उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांनी गुड्डापुर ता. जत येथे पत्रकार बैठकीत जाहीर केली.

Rate Card

हेही बघा..

अँड.सी.आर.सांगलीकर यांची जत पुर्व भागातील पाण्याबाबतची भूमिका

सांगलीकर पुढे म्हणाले की,निवडणुका येतात आणि जातात परंतु हा कायम दुष्काळी असलेल्या गावांचा कायापालट करण्यासाठी कोणीही राजकर्त्यांनी अद्यापपर्यंत प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.जे काय केल्याचा दावा काही लोक करत आहेत,तो राजकीय फायद्याचा भाग आहे. शासन स्तरावर म्हैसाळ योजनेच्या  पाण्याबाबत कृष्णा खोरे योजनेसाठी पाणी लवादाने या तालुक्यातील गावांसाठी किती पाणी देण्यात येणार आहे.यांची माहिती देखील येथील राजकारण्यांना नसावी हे यांचे अज्ञान की जनतेला फसवून मतदान मिळवायचे,सत्ता मिळवायची,पुन्हा पाच वर्षे सत्ता भोगायची असा पांयडा पाडलेला दिसत आहे.त्यामुळे जो आज गुड्डापूर येथील 64 गावातील शेतकऱ्यांचा जो मेळावा आयोजित केला आहे.या मेळाव्यामध्ये घेण्यात आलेले निर्णय जर या भागातील प्रत्येक गावाने घेतल्यास माझा पाठिंबा शेतकरी आणि जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर ठाम आहे.जत तालुक्यातील जनतेने पाणी योजनेसाठी संघर्ष करावयास तयार राहावे असे आवाहन सांगलीकर यांनी केले.

 जतच्या विकासासाठी विधानसभेच्या रिंगणातजत तालुका जन्मभूमी आहे.येथील भकासपण मनाला वेदना देते.शहरात मी उद्योग उभारले मात्र जतच्या मातीसाठी काहीतरी करण्याची उमेद मला येथे घेऊन आली आहे. विधानसभा निवडणूक जतच्या विकासासाठी लढवित आहे.एकदा विश्वास टाकून बघा असेही आवाहन सांगलीकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.