जत विधानसभेची जागा राष्ट्रवादीला ? | कॉंग्रेस 125, राष्ट्रवादी 125 जागांचा फॉर्म्युला

0

जत,प्रतिनिधी : राष्ट्रवादी-कॉग्रेसचे राज्यातील आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले आहे. दोन्ही पक्ष समसमान 125 जागा लढविणार आहेत. 

सांगली जिल्ह्यातही दोन्ही पक्षाला समान जागा मिळल्यास जतची जागा ही राष्ट्रवादीला जाण्याचे खात्रीदायक वृत्त आहे.

सोमवारी कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असून कॉग्रेस 125 तर राष्ट्रवादी 125 तर मित्र पक्षांना 38 जागा सोडण्यात आल्या आहेत.

Rate Card

त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील 8 जागापैंकी कॉग्रेस 4 तर राष्ट्रवादी 4 जागा मिळणार आहेत. सध्या जत व सांगली विधासभेसाठी दोन्ही पक्षांत रस्सीखेच आहे.2009 सालातील जागावाटपानुसार सांगली कॉग्रेसला तर जत राष्ट्रवादी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

त्यामुळे जतेत पुन्हा घमासान होणार आहे.2009 च्या विधानसभा निवडणूकीवेळी जतची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली होती. येथून विद्यमान आमदार विलासराव जगताप राष्ट्रवादीकडून उभे राहिले होते. त्यामुळे कॉग्रेसच्या नेत्यांनी बंड करत भाजपचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांना पांठिबा दिला होता. त्यात शेंडगे विजयी झाले होते.

यावेळीही जतची जागा दोन्ही पक्षांनी मागितली आहे.त्यामुळे आघाडीचा विचार केला तर 2009 च्या फॉर्म्यूला नुसार जत राष्ट्रवादी कॉग्रेसला दिली जाऊ शकते.राष्ट्रवादीमधून येथून माजी सभापती सुरेश शिंदे, रमेश पाटील इच्छूक आहेत. याबाबत कॉग्रेस नेत्यांची भूमिका काय असू शकेल हे तिकिट वाटपानंतर निश्चित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.