संखमध्ये विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचे मुत्यू

0
Rate Card

संख,वार्ताहर : संख ता.जत येथील शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मुत्यू झाला.मल्लिकार्जुन व्हनाप्पा माळी(वय 38),रा.पाटील वस्ती संख असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे.

घटनास्थंळावरून मिळालेली अधिक माहिती अशी,मुळ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील हुबनूर येथील मल्लिकार्जुन माळी हे संख येथे शेती घेऊन गेल्या 15 वर्षापासून कुंटुबासह राहत आहेत.तेथे त्यांची द्राक्ष बाग,केळी व इतर पिके आहेत.रवीवारी मध्यरात्री पिकांना पाणी देण्यासाठी मल्लिकार्जुन यांनी मोटार चालू केली.मात्र घरापाठीमागे असणाऱ्या बोअरवेल्सची पाईप निघाल्याने ते पाईप बसविण्यासाठी जात असताना त्यांच्या शरिराला विजेचा स्पर्श झाला.त्यात त्यांचा जागेवर मुत्यू झाला.सकाळी हा प्रकार समोर आला.दरम्यान प्रचंड कष्टाळू शेतकऱ्यांचा विजेच्या लंपडावामुळे मुत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान रात्री उशिरापर्यत उमदी पोलीसात गुन्हा दाखल नव्हता.

विजेच्या लंपडावामुळे शेतकऱ्याचा मुत्यू 

संख परिसरात विजेता लंपडाव सुरू आहे.दिवसा कमी दाबाने विज पुरवठा होता.लोडसेंटीगच्या अनियमित वेळा यामुळे शेतकऱ्यांना धाका पत्करून रात्री-अपरात्री पिकांना पाणी द्यावे लागते.मल्लिकार्जुन माळी यांचा विज वितरण कंपनीच्या भोगळपणामुळे मुत्यू झाल्याचा आरोप स्वा.शेतकरी संघटनेचे नेते भिमाशंकर बिराजदार यांनी केला.दिवसा उच्च दाबाने विज पुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही बिराजदार यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.