हप्तेबाजीमुळे धोकादायक प्रवाशी वाहतूक

0
5

जत,(का.प्रतिनिधी): जत शहरातून उमदी,संख,उमराणी,शेगाव,येळवी,चडचण,सांगली मार्गावर अवैध प्रवाशी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांमध्ये प्रवाशी मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा लागलेली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मार्गावर असलेल्या संबंधित पोलिस ठाणे व अन्य संबंधित व्यवस्था दरमहा सांभाळावी लागत असल्याने दररोज जास्तीचा व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही. मंथली सांभाळली की ना पोलिस अडविणार ना प्रादेशिक परिवहन अधिकारी. चौका-चौकात झालेली प्रवाशी वाहनधारकांची मक्तेदारी मोडित काढणे कठीण बाब आहे. उमदी,उमराणी,विजापूर,या मार्गावर जाण्याकरिता नंबरला लावलेली गाडी काळी पिवळी असो की टमटम 15 प्रवाशी बसल्याशिवाय गाडी सुरु होत नाही. मग कोणी कितीही ओरड केली तरी त्याचा उपयोग होत नाही. शहरांमध्ये जागोजागी उभे असलेले पोलिस असे कोबून प्रवाशी घेवून जाणार्‍या वाहनांकडे नजर चुकवितात. वाहतूक शाखेच्या पोलिसांना बहुदा हे दिसत नसावे पण पर जिल्हातून ग्रामीण भागातून आलेला एखादा दुचाकीस्वार किंवा मालवाहतूक करणारे टेम्पो पोलिसांच्या जाळ्यात सहज सापडतो अन् पावतीही देतो.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here