मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आजी आजोबांच्या यथोचित सन्मानाचा सोहळा

0

आजी-आजोबा कुटुंबाचे आधारवड : तहसीलदार सचिन पाटीलकवठेमहांकाळ :   मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ज्येष्ठ नागरिक दिन (ग्रँड पॅरेंट्स डे) मोठ्या उत्साहात साजरा झाला.प्रांरभी प्रमुख पाहुणे जतचे तहसीलदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते  सरस्वती पूजन करण्यात आले. त्यावेळी संस्थेच्या  सचिव नेहा माळी,प्राचार्य डॉ.प्रभाकरन नायर,सौ.अश्विनी माळी,सौ.देवयानी पाटील,अँडमिनिस्ट्रेटिव्ह सचिन कदम आदी मान्यवर व विद्यार्थ्यांचे आजी आजोबाही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजी आजोबांनी एकत्र येऊन केक कापला.तहसीलदार सचिन पाटील म्हणाले,  आजी-आजोबा कुटुंबाचे आधारवड असतात. विद्यार्थ्यांनी आजी आजोबांच्या कडून संस्काराची शिदोरी घ्यावी.आजी आजोबांचा मान राखावा.ज्येष्ठ म्हणून प्रत्येक कुंटुबात आजी-आजोबा मार्गदर्शक असतात.सौ.नेहा माळी म्हणाल्या, एकविसाव्या  शतकात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबांचे स्थान हरवत चालले आहे . आजीआजोबां प्रती सर्वांनी आपल्या आदराची भावना ठेवली पाहिजे.भक्ती बंडगर व श्रुती भोसले या विद्यार्थिनींनी आजी आजोबां विषयी मनोगते व्यक्त केली. प्राचार्य डॉ. प्रभाकरन नायर यांनी आजी आजोबांविषयीचे विचार विषद केले. आजी आजोबांसाठी काही विशेष फनी गेम्सचे आयोजन केले होते.यात बॉल इन बकेट विजय शिंदे,उखाणे लक्ष्मी यादव,नातवाने टिकली लावण्याच्या स्पर्धेत ए.एम.नदाफ,ड्रिंकिंग वॉटर पंडित पवार व त्यांच्या पत्नी सौ. मालन पवार,संगीत खुर्ची बाबासाहेब चव्हाण या आजोबांनी,तर लांडगे आजींनी प्रथम क्रमांक मिळवला.सूत्रसंचालन पी.जे.कलमडे,साक्षी कोळेकर हिने केले. तर आभार श्रृती भोसले हिने मानले.कवटेमहांळ मोहन माळी इंटरनँशनल स्कूलमध्ये जेष्ठ नागरिक दिन केक कापून साजरा करण्यात आला.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.