जतेत सोन्याचे दुकान फोडले,तीस हाजाराचा ऐवज लंपास

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत शहरातील मध्यवर्ती एचडीएफसी बँकेशेजारचे ज्वेलर्स दुकान फोडून चोरट्यांनी तीस हजार रूपयाच्या चांदीच्या वस्तू पळविल्या.घटना शनीवारी मध्यरात्री घडली.याप्रकरणी दुकानचे मालक संतोष मच्छिंद्र घाटगे,(रा.नीलसागर लॉजजवळ,जत)यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.

अधिक माहिती अशी,एचडीएफसी बँकेजवळीस अस्लम बेंद्रेकर यांच्या गाळ न.3 मध्ये संतोष घाडगे यांचे ज्वेलर्स दुकान आहे. शनिवारी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले होते.चोरट्यांनी मध्यरात्री स्वेटर उचकटून आत प्रवेश करत चांदीचे ग्लास,वाट्या,जोडवी असे 30,593 रूपयाचा ऐवज पळविला. रविवारी सकाळी त्यांना हा प्रकार लक्षात येताच पोलीसात धाव घेतली.दुकानातील सीसीटिव्ही रेकार्डमध्ये दोन चोरटे कैद झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.