जत विधानसभा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लढवावी | अँड.श्रीपाद अष्टेकर

0
7

Image result for प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील png

जत,प्रतिनिधी :  जत विधानसभा मतदार संघातील इच्छकांची संख्या व होणारे वादविवाद,टीका यामुळे इंच्छूकांपैकी कोणासही तिकीट मिळाले तर निवडणूक एक सघ लढविली जाणार नाही.तालक्याच्या विकासाच्या दृष्टीने जत मतदार संघातून भाजपाचे प्रदेश अध्यक्ष,महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी भाजपाचे जेष्ठ नेते अँड.श्रीपाद अष्टेकरसह कार्यकर्त्यांनी केली आहे.तालक्याच्या विकासाच्या चर्चेपेक्षा ईषा व कुरघोडीचे राजकारण चालले आहे.स्वातंत्र्य प्राप्ती नंतर अपवाद वगळता अनेक वर्षे हा मतदार संघ राखीव होता.त्यामुळे मात्तबर स्वतंत्र विचारांचा आमदार या मतदार संघाला लाभला नाही.तत्कालीन काँग्रेसच्या धुरीणांनी राजकारण आपल्याच ताब्यात ठेवल होत. त्यांनी तालुक्यापेक्षा आपलाच विकास करुन घेतला परिणामी जत तालुका मुळात दुष्काळी व मागासच राहीला.मतदार संघ सर्वसाधारण झालेवर एकवेळ आमदार भाजपाचा पण सरकार आघाडीचे त्यामुळे विकासाला गती मिळाली नाही. यावेळी फक्त आमदार व सरकार एकाच पक्षाचे असल्याने विकासाला गती मिळाली. केंद्र व राज्य सरकारने तालुक्याला भरभरुन सहाय्य केले व सरकारच्या माध्यमातुन अनेक विकास कामे झाली. परंतु यावेळी अनेकांच्या महत्वाकाक्षा वाढल्याने चुरस निर्माण झाली आहे.चुरशी पेक्षा कुरघोडीचे व्यक्ती द्वेशाचे राजकारण चालल आहे. पक्षा पेक्षा मी मोठा ही संकल्पना भाजपाला मान्य नाही. यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल हे निश्चीत नाही. दोन गटापैकी एकाला उमेदवारी मिळाली तरी निवडणूक एकसंघपणे लढविली जाणार नाही असे स्पष्ट दिसते. दुसरा गट गप्प बसेल की बंडखोरी करेल याची चिंता आहे.राजकारण व व्देश या थराला पोहचला आहे की पक्ष दोघांची समजुत काढू शकेल असे वाटत नाही.हे सर्व रोकण्यासाठी चंद्रकांत दादा हे योग्य उमेदवार आहेत. नितीन गडकरी यांचे प्रमाणे त्यांनाही जनतेतुननिवडून येण्याचे आव्हान आहे व त्यांना मतदार संघ हवा आहे. यासाठी हा मतदार संघ

सुरक्षित आहे. नरेंद्र मोदी गुजराथचे असून उत्तर प्रदेशातील वाराणशीतुन निवडून येतात,अशी अनेक उदाहरणे केंद्रात व राज्यात आहेत. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने हा उपाय

योग्य आहे.चंद्रकांत दादानी जर जतचे प्रतिनिधीत्व केले तर महाराष्ट्रातील मात्तबर नाही,तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यती मधील व्यक्ती जतचा आमदार होईल आणि मग जता तालुक्याच्या कोणत्याही विकासाला मर्यादा राहाणार नाहीत.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here