जत | आगामी विधानसभा लढविणारच | गोपीचंद पडळकर | जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेले बरे |

0

जत,प्रतिनिधी : जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपात जाणे बरे म्हणून राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरू आहे,अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी जत येथील पत्रकार परिषदेत दिली.यंदा जत,सांगोला किंवा खानापूर-आटपाडी मतदार संघातून निवडणूक लढविणार आहे.मात्र विधानसभा निवडणूक वंचित आघाडीकडून की भाजपमधून हे सांगण्याचे त्यांनी टाळत त्यांनी

सस्पेन्स मात्र कायम ठेवला.यावेळी अनिल पाटील,दादासाहेब पांढरे,मुकूंद बंडगर,भाऊसाहेब दुधाळ,लक्ष्मण जखगोंड, नागनाथ मोटे आदी उपस्थित होते.

गोपीचंद पडळकर म्हणाले की,

Rate Card

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जनतेचा कौल घेऊन सांगोला,खानापूर-आटपाडी किंवा जत या तिन्ही पैंकी एका मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार आहे.रविवारी जत तालुक्यातील युवकांच्यासाठी दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत उमा चॅरिटेबल ट्रस्ट येथे नोकरी मेळावा आयोजित केला आहे.त्यामध्ये 

राज्यातील सुमारे 40 ते 45 नामांकित कंपन्याचे प्रतिनिधीच्या उपस्थितीत  बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याचा तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

पडळकर म्हणाले, जत तालुका हा परिवर्तनवादी मतदार संघ असून येथील जनतेला बंडखोरी करणारी व्यक्ती आवडते.जत तालुक्याच्या पूर्व भागातील 44 गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वेगळी योजना केली पाहिजे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतून 24 तास पाणी द्यावे, अशा मागण्या मी शासनाकडे करणार आहे.पाण्याचे राजकारण न करता पाणी मिळण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.मी 2009,2014 मध्ये मी विधानसभा निवडणूक लढवली आहे.माझा निर्णय येत्या आठ ते दहा दिवसात घोषित करणार असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. वंचित आघाडीचे 288 उमेदवार तयार असून काँग्रेसला 144 जागांची ऑफर बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे. अद्यापही त्यांनी आपला निर्णय कळवला नाही,असे सांगत राष्ट्रवादीमध्ये आऊटगोइंग का सुरू आहे,असे विचारताच जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेले बरे म्हणून राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये जात असल्याचा टोला पडळकर यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.