जत | राडेबहाद्दरावर अखेर गुन्हा दाखल | मुख्य आठ जणांना अटक,सुटका | राज्यभर पोहचला घटनेचा व्हिडिओ

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेच्या राड्यानंतर अखेर पोलीसांनी राडेबहाद्दर नगरसेवक व समर्थकांना पोलीसांनी दणका दिला.दोन्ही गटाकडून कोणतीही तक्रार आली नाही.मात्र कायदा सुव्यवस्था बिघडविल्या प्रकरणी जत पोलीसांनी मुख्य आठ जणासह सुमारे 20 जणावर गुन्हा दाखल केला.गुरूवारी त्यांना अटक करून सांयकाळी जामिनवर सोडण्यात आले.मात्र नगरपरिषदेच्या या रंगतदार घटनेची कहाणी राज्यभर पोहचली आहे.एबीपी माझा सारख्या प्रतिष्ठित चँनेलने जतची बातमी व्हिडिओ सह प्रकाशित केली आहे.

जत नगरपरिषदेच्या मासिक सभेदरम्यान बुधवारी सभापती टिमू ऐडके व नगरसेवक उमेश सांवत यांच्या गटात हाणामारी झाली होती.दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी ऐकमेकाच्या अंगावर धावून जात मारहाण केली होती.यांचे व्हिडिओ दिवसभर सोशल मिडिया वर फिरत होते.त्याशिवाय पोलीसांच्या समोर घटना घडल्याने रात्री उशिराने पोलीसाच्या वतीने दोन्ही गटातील उमेश सांवत, टिमू एडके,समिर उमराणी,योगेश एडके,अमिर शेख,आण्णा भिसे,मिथून भिसे,महेश शिंदे(पाथरूट)सह अनओळखी सुमारे वीस जणाविरोधात 324,160,31(1) अतर्गंत गर्दी मारामारी,जमाव बंदीचा भंग आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला होता.

गुरूवारी यातील आठ जणांना पोलिसांनी अटक केली.सायकांळी जत न्यायालयाने त्यांची जामिनवर मुक्तता केली.

दरम्यान नगरसेवकांसारख्या जबाबदार पदावर असतानाही असे कृत्य करण्याने नगरपरिषदेची नाचक्की झाली आहे.सभागृहात खरेतर विकात्मक कामाबाबात वैचारिक वादविवादाला फाटा देत थेट हाणामारीचे प्रकार सातत्याने घडत आहेत.त्यामुळे नगरपरिषद बरखास्त होण्याची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हद्दपारीची कारवाईची शक्यता 

जत शहरातील अलीकडच्या काही घटनामुळे शहर अंशात होत आहे.त्यामुळे कायदासुव्यस्था आबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस कार्यालयाकडून जत शहरातील अनेक गुन्हे दाखल नेते,कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.त्याशिवाय निवडणूक काळात हद्दपारची कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.पोलीसांनी या वृताला दुजोरा दिला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.