जत,प्रतिनिधी : महिला छेडछाडी विरोधात निर्भया सखीची शहरात गस्त राहणार आहे. जत तालुक्यात अशी पथके स्थापन करण्यात आली असून प्रत्येक पथकात एक महिला पोलीस कर्मचारी असणार आहे. यामुळे महाविद्यालय,कॉलेज सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या प्रकारावर रोकणे शक्य होणार आहे.छेडछाडी विरोधात निर्भया सखींची नेमणूक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा,अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले यांनी दिले होते.त्यानुसार शहरातही अशा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात त्यांची गस्त राहणार आहे.निर्भया सखींना डिवायएसपी दिलीप जगदाळे,जतचे पो.नि.शिवाजी गायकवाड,उमदीचे दत्तात्रय कोळेकर यांच्या हस्ते निर्भया सखीना टोप्या प्रदान करण्यात आल्या.
यावेळी निर्भया पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
जत निर्भया सखींना टोप्याचे वाटप करताना डिवायएसपी दिलीप जगदाळे, पो.नि.शिवाजी गायकवाड,दत्तात्रय कोळेकर आदी





