मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

0
Rate Card

 कवठेमहांकाळ : मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्यरत असणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा यथोचित सत्कार करून शिक्षक दिनाचा अनोखा सोहळा साजरा  करण्यात आला. 

प्रांरभी प्रमुख अतिथी अलकूड(एस)च्या संरपच सौ.मनीषा कांबळे यांच्या शुभहस्ते सरस्वती व माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले.संस्थापक मोहन माळी,सचिवा सौ.नेहा माळी,प्राचार्य डॉ. प्रभाकरन नायर,ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सचिन कदम,शिक्षक व विद्यार्थी उपस्थितीत  होते.यावेळी स्कुलच्या वतीने ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचा वसा घेतलेल्या शिक्षक,शिक्षकत्तेर कर्मचाऱ्याचा यथोचित गौरव केला.

मोहन माळी म्हणाले,शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांच्या आदरार्थ जगभरात हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो. साधरण विसाव्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली. भारतामध्ये सर्वात आधी 1962 मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. आपल्याकडे जरी हा दिवस 5 सप्टेंबरला साजरा करण्यात येत असला तरी जगभरात वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. पाच ऑक्टोबरला जगातील अनेक देशात शिक्षक दिन असतो. सूत्रसंचालन साक्षी कोळेकर तर

ओम शिंगे,श्रुती भोसले व भक्ती बंडगर यांनी संयोजन केले. 

मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.