माडग्याळमध्ये डेंग्यूचा पुन्हा रुग्ण सापडला | आरोग्य विभाग,ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : घरटी तापाचे रुग्ण

0

माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळमधील डेंग्यूची साथ वाढतच चालली आहे.येथील महिला पोलीस सौ.पूजा राजेंद्र सावंत (वय 28)आणि आशाराणी महादेव कोरे (वय14) यांना डेंग्यूची लागण झाली आहे.डेंग्यूच्या रुग्णांची संख्या यामुळे 5 वर पोहचली आहे.

डेंग्यू झाल्याचे निष्पण झालेल्या पुजा सांवत व आशाराणी कोरे यांच्यावर सांगली येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 

गेल्या काही दिवसात तापाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत.

त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.खाजगी दवाखाने तापाच्या रुग्णांने फुल्ल झाले आहेत.डेंग्यूच्या साथीने थैमान माजविले असतानाही आरोग्य विभाग,ग्रामपंचायतीकडून किरकोळ ओषध फवारणी वगळता काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत.

Rate Card

रुग्णाचा सर्व्हे किंवा उपाययोजना बाबत काहीच हालचाली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.माडग्याळ मधील बिरोबा गल्ली,सावंत नगर परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे.गटारीतील अडलेले सांडपाणी,गावात असणारे उकिडे,घाणीचे साम्राज्य यामुळे डांस झुंडी तयार झाल्या आहेत. सांयकाळ नंतर गावात डांसाचे राज्य असते.डांस नागरिकांना फोडून काढत आहे.

आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याने साथ वाढतच चालली आहे.त्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.माडग्याळमध्ये सावंत वस्ती येथील उमदी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस सौ.पूजा सावंत यांना डेंग्यूची झाल्याचे निश्चित झाले आहे.त्यांच्यावर सांगली येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.पाच दिवसांपूर्वी सदाशिव नगर येथील महिला पारुबाई सावंत,नंदाबाई शिवशरण(मायथळ),कविता पुजारी(गुड्डापूर)यांना डेंग्यू झाला आहे.प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.