जत | बुधवारी जतेत संविधान जागर मेळावा | नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांची माहिती |
जत,प्रतिनिधी : येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जंयतीनिमित्त बुधवार,ता.4 संप्टेबरला सांयकाळी 7 वाजता संविधान जागर मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी आमदार विश्वजीत कदम,कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत,माजी आमदार उमाजीराव सनमडीकर प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
संविधानप्रती बहुजन समाजातील जागरूकता या विषयावर बहुजन समाज चळवळीतील नेत्या सुषमाताई अंधारे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉ.मनोहर मोदी,भाऊसाहेब जगधणे,शशिकांत कोळी,किरण जाधव,डॉ.शरद पवार,अविनाश वाघमारे,डॉ.चंद्रमणी उमराणी,रज्जाक नगारजी,परवेज गडीकर,मुस्साभाई गवंडी आमान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
भूपेंद्र कांबळे म्हणाले,जत शहरात आम्ही यापुर्वी संयुक्त जयंती कार्यक्रम घेत होतो.मात्र यावेळी संविधान कार्यक्रम आयोजित केला आहे. आजच्या तरूणात संविधान प्रती जागृत्ती,श्रध्दा असावी,संविधानाची माहिती कळावी या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याशिवाय शहरातील विविध क्षेत्रात उकृष्ठ काम केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कांबळे यांनी केले.
संविधान मेळावा,नगरसेवक भूपेंद्र कांबळे पत्रकार परिषद लाईव्ह व्हिडिओ पहा

