करजगी | परिसरात अवैध धंदे बेलगाम | वाळू,दारू,मटक्याने जनजीवनावर परिणाम |

0
Rate Card

करजगी,वार्ताहर : उमदी पोलीस ठाण्याअंतर्गत करजगी परिसरात अवैध धंदे सर्रासपणे सुरूच आहेत.बेकायदा वाळू, सट्टा-पट्टीसह अवैध गावठी दारू भट्टय़ा, असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत.उमदी पोलीस अवैध धंद्याना आवर घालण्या ऐवजी वाढवित असल्याचे आरोप होत आहेत. 

उमदी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या करजगीसह जवळपास सर्वच गावात मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. त्यात गावठी दारू विक्री,वाळू तस्करी, अवैध वाहतूक, अवैध जुगार अड्डे असे अनेक प्रकारचे अवैध धंदे थेट उघड्यावर सुरू आहेत. पोलीसाच्या साथीने मटका,जुगार चालकाकांडून धमकाविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे कोणीही सभ्य व सामान्य नागरिक याविरुद्ध आवाज उठवित नाही.अवैध वाहतूक, जुगाराबाबत असे प्रकार चालू असतात. रस्त्याच्या किनार्‍यावर व आजुबाजुच्या क्षेत्रात अवैध धंदे सुरू आहेत. अवैध प्रवासी वाहतुकीकडून हफ्ता जमा करून वाहनधारकासह सट्टे, जुगार मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. ग्रामीण भागातील तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याने सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. मेहनतीचा पैसा घरात न जाता सट्टा, जुगार, दारु यात उडविला जात असून, या धंद्यांना पोलिसांचा आशिर्वाद लाभत आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून अवैध धंदे बंद करावे अशी मागणी होत आहे.

बेसुमार वाळू तस्करीने नदीकाठ वाळवंटएकेकाळी सदन असणाऱ्या बोर नदी काठावरचे करजगीसह परिसरातील गावे मुबलक पाणी असणारी गावे बेसुमार वाळू तस्करीने वाळवंट बनली आहेत.संख महसूल विभाग डोळे उघडे ठेऊन हे पाहत आहे.मात्र कारवाईबाबत त्यांनी आकडता हात घेतला आहे.

करजगी परिसरातील नदी पात्रात वाळू तस्करांनी नदी काठ ओरबडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.