कडकनाथ कोंबडी प्रकरण | जतेत 54 लाखाची फसवणूक | 31 शेतकऱ्यांचे पोलीसांना निवेदन | 57 युनिटची उभारणी

0

जत,प्रतिनिधी : शेतीपूरक व्यवसायाशी निगडित कडकनाथ कोंबडी पालनातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर येत असताना या कंपनीने जत तालुक्यात असे 57 युनिट स्थापन करत सुमारे 31 शेतकऱ्यांना 54 लाखावर गंडा घातल्याचे समोर आले आहे. जत तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी जत पोलीसांना लेखी निवेदन देत संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

संबधित कंपनीच्या कार्यालयात चौकशी केली असता या शेतकऱ्यांना धमकावून हुसकावून लावण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

इस्लामपूर स्थित कडकनाथ कोंबडी पालनाशी संबंधित कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती असून सुमारे आठ हजार गुंतवणूकदारांची 500 कोटींपेक्षा अधिक रक्कम अडकली आहे.

Rate Card

त्यात जत तालुक्यातील 31 शेतकऱ्यांचा समावेश आहे.त्यांची 54 लाखावर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

गुंतवणूकदारांचा तगादा मागे लागल्याने या कंपनीच्या संचालकांनी पुणे येथे मुक्काम ठोकला आहे. आता अटकपूर्व जामीन घेण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कंपनीने 100 रुपयांच्या मुद्रांकावर अनेक गोष्टींचा उल्लेख करत नोटराईज्ड लेख लिहून दिला आहे.आमची कंपनी प्रामुख्याने रेशीम, मत्स्य, कुक्कुटपालन व शेळी पालनाचा व्यवसाय करत आहे. लोकांना प्रशिक्षण देणे, व्यवसाय उभा करुन देणे तसेच व्यवसायातून उत्पादित होणारा माल खरेदी करणे याबरोबरच शेतकऱ्यांना विश्वास देऊन खरेदीची कंपनी हमी देते. आमची कंपनी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करत नाही, असे सांगत कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या मुद्रांकावर बोगस स्वाक्षऱ्या आहेत, त्यावर नावाचा उल्लेख नाही. या कंपनीचा बोगस कारभाराचा पर्दाफाश झाल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पोलीसात धाव घेतली आहे.
जतेत पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब दुधाळ,रावसाहेब दुधाळ,लक्ष्मी दुधाळ,नामदेव दुधाळ,सुनिल दुधाळ,समाधान गडदे,प्रकाश गडदे,उमाजी गडदे,मारुती गडदे,विकास पाटील आदी शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.

जत तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी जत पोलीसांना निवेदन जिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.