सोन्याळच्या तरूणाचे मुत्यू प्रकरण,अद्याप धागेदोरे नाहीत

0
7

जत,प्रतिनिधी :  उटगी – बेळोंडगी रोडवर शेळ्या-मेढ्याचे व्यापारी शिवाजी मोहन खरजे (वय 28)रा.सोन्याळ यांचा संशास्पद मृत्तदेह आढळून आला होता.

मृत्तदेहाजवळ दुचाकी उभी होती.त्यांची चावी खिशात सापडल्याने व्यापाऱ्याचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या कुंटुबियांनी व्यक्त केला होता.त्याशिवाय अपघात झाला असे म्हटल्यास,दुचाकी पडणे गरजेचे होते.मात्र दुचाकी रस्त्याच्या कडेला व्यवस्थित उभी होती.मोबाईल गायब झाला आहे. व्यापारी दारू पित नसतानाही मृत्तदेहाजवळ दारूची बाटली सापडल्याने सर्व परिस्थिती संशस्पाद होती.त्यामुळे पोलीसांनी तसा तपास सुरू केला आहे. मात्र तिसऱ्या दिवसापर्यत तपास सुरू आहेच्या पुढे तपास झाल्या नसल्याचे पोलीसाकडून सांगण्यात आले. त्यांच्या मोबाइल नंबरवरून काही महत्वपूर्ण माहिती लागण्याची शक्यता आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here