कर्नाटकातून जतला पाणी मिळणार | आ.एम.बी.पाटील यांचे येरळा सोसायटीच्या शिष्टमंडळास आश्वासन

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : कर्नाटक शासनाच्या तुबची बबलेश्वर सिंचन योजनेतून जत तालुक्यातील भिवर्गी आणि तिकोंडी तलावात पाणी सोडण्याचे आश्वासन विजापूरचे माजी मंत्री आमदार एम बी पाटील यांनी दिली असल्याची माहिती तिकोंडीचे उपसरपंच मुताणा वडियर यांनी दिली. बाबानगर येथील कॅनॉलच्या उद्घाटन प्रसंगी आमदार एम.बी.पाटील यांनी जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट घेऊन याची मागणी केली होती.विजापूर येथील आमदार पाटील यांनी कॅनॉलच्या उद्घाटन प्रसंगी येरळा प्रोजेक्ट सोसायटीच्या पाठपुराव्यानंतर ही घोषणा केल्याचे येरळा प्रोजेक्टचे सचिव देशपांडे यांनी सांगितले.सप्टेंबर नंतर कर्नाटकच्या योजना बंद होतात. त्यानंतर त्या सुरू ठेवून त्यातून जत तालुक्याच्या सीमावर्ती भागाला पाणी द्यावे,अशी मागणी येरळाचे सचिव देशपांडे,सिद्धण्णा राचगोंड,भीमराव हदीमनी,मुत्तप्पा वडियर, बिलेनसिद्ध बिराजदार,सुखदेव राजगोंड,सत्यप्पा अमृतहट्टी,आमसिद्ध सुसलाद आदींच्या शिष्टमंडळाने आमदार पाटील यांची विजापूर येथील निवासस्थानी भेट घेतली.या भेटीत त्यांना नैसर्गिक उताराने जत तालुक्यातील गावांना पाणी देता येते हे पटवून देण्यात आले.त्यासाठी सध्या तुबची बबलेश्वर योजनेच्या तिकोटा येथील तलावातून पाणी सोडावे लागेल,सध्या कर्नाटक शासन या भागातील तलाव भरून घेत आहेत.ते पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत शेतीसाठी उपलब्ध होणार आहे.जत वासियांच्या भावनांचा आदर करीत त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाबानगर येथील कार्यक्रमात आमदार पाटील यांनी जत तालुक्यात पाणी देण्यात येईल अशी घोषणा भर सभेत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.