जत | रासपकडून जनावरांचे आरोग्य शिबीर व चारा वाटप |

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : राष्ट्रीय समाज पक्षाच्या 16 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जतचे तहसीलदार सचिन पाटील व पशुधन विकास अधिकारी डॉ.व्ही.बी.जवणे यांच्या हस्ते जनावरांच्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करून मोफत हिरवा चारा वाटप करण्यात आला.

जत शहरातील गुरुवारच्या आठवडी जनावर बाजारामध्ये रासप जत आयोजित मोफत आरोग्य शिबीत लसीकरण, जंतनिर्मूलन औषधे व इतर आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. त्याशिवाय हिरवा चारा वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार सचिन पाटील म्हणाले,तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असून आज देखील चारा छावण्या सुरू आहेत. रासपने वर्धापन दिनी अतिशय चांगला कार्यक्रम राबवला असून इतर भागातील लोकांनी देखील हा आदर्श डोळ्या समोर घेऊन दुष्काळी तालुक्याला मदतीचा हात देण्याची गरज आहे. 

पशुधन विकास अधिकारी डॉ.जवणे म्हणाले, रासपचा वर्धापन दिनाच्या निमित्याने आज जनावरांना जंतनिर्मूलण औषधें, लसीकरण, औषधें वाटप करण्यात आली. रासपचा माध्यमातून योग्य वेळी हा कार्यक्रम घेऊन जनावरांना आरोग्य तपासणी करण्यात आली. 

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील, जिल्हाध्यक्ष मारुती सरगर, रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,भाजपचे जत तालुका कार्याध्यक्ष सुनील पवार, माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक उमेश सावंत, नगरसेवक प्रकाश माने,प्रमोद हिरवे, रासपचे तालुकाध्यक्ष किसन टेंगले, शहराध्यक्ष भूषण काळगी, अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष आकिल नगारजी, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष ओंकार बंडगर, सर्वोदय पतसंस्थेचे संचालक रामचंद्र मदने, डॉ.प्रवीण वाघमोडे, संतोष मोटे, अजिंक्य सावंत, आदिवासी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसवंत चव्हाण, रासप जिल्हा सचिव सुरेश हाक्के, अमृत जानकर, अनिल मिसाळ, बसवंत हिरवे, नागनाथ मोटे, अशोक गडदे, संभाजी टेंगले, विकास म्हारनूर, धनाजी मोटे, डॉ.वाघमारे, तसेच पशुसंवर्धन विभागाचे सर्व स्टाप सहित जत तालुक्यातील रासपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

रासपच्या वृधापन दिनानिमित्त जनावरांना चारा वाटप करताना तहसीलदार सचिन पाटील व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.