जत | उद्या येणार गणरायं | मंडळांची तयारी अंतिम टप्यात, मुर्तीचे स्टॉल,सजावट साहित्याचे स्टॉल सजले |

0

जत,प्रतिनिधी : श्री.गणरायाच्या आगमनाला अवघे तोविस तास शिल्लक राहिले असून, शहरात उत्सवासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. एकीकडे विक्रीसाठी विविध आकर्षक मूर्तींची मांडणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विविध देखाव्यांसाठी स्टेज उभारणीचे काम जोरात सुरू आहे. जिल्हा व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.
शहरातील सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाची ओळख आहे. गेल्या एक महिन्यापासून विविध मंडळांची लगबग सुरू झाली आहे. मंडळांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. मंडळ नोंदणी करण्याबरोबरच विविध शासकीय परवानगी घेण्याचे काम सुरू आहे. आता गणेशोत्सव तोविस तासावर येऊन ठेपला आहे.दुष्काळ व पुरपरिस्थितीमिळे यावर्षी मरगळ आहे.मात्र तरीही विघ्नहर्त्याच्या तयारीचा आनंद काही औरचं नसल्याने मंगलमय वातावरण तयार झाले आहे.ऑगस्ट संपला तरीही अद्याप म्हणावा तसा पाऊस सुरू झालेला नाही. याचा परिणाम गणेशमूर्तींच्या विक्रीवर होणार असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनानुसार पर्यावरणपूरक मूर्ती विक्रीवर भर देण्यात आलेला आहे. पावसाला आता सुरुवात झाल्यामुळे खरेदीला लोकांमध्ये उत्साह दिसून येतो. 90 टक्क्यापर्यंत मूर्तींचे बुकिंग झालेले आहे. यावर्षी शाडूंच्या मूर्तीवर भर देण्यात आलेला आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नेण्याचे प्रमाण आता कमी होत आहे.सहा इंचापासून ते 2 फुटापर्यंत शाडूची मूर्ती उपलब्ध आहे.हत्तीवर व सिंहावर आरुढ झालेल्या आकर्षक मूर्तीच्या बुकिंगसाठी लोकांची मागणी आहे. जत शहरासह तालुक्यातील डफळापूर, शेगाव, संख,माडग्याळ, वळसंग, उमदी,उटगी,तिंकोडी,बिळूर, कुंभारी आदि गावातील रस्त्यावर मूर्ती विक्रेत्यांनी स्टॉलची उभारणी केलेली आहे. या ठिकाणी खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत आहेत. जीएसटीमुळे 10 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सोहळा शांततेत पार पडावा यासाठी प्रांताधिकारी, डिवायएसपीकडून ठिकठिकाणी गणेश मंडळांच्या बैठका घेतल्या जात आहेत. बैठकीत डॉल्बी बंदीवर जोर देण्यात आला. डॉल्बी लावल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.यावर्षी जिल्हाधिकार्‍यांनी प्रदूषण टाळून इकोफ्रेंडली उत्सव साजरा करण्यावर भर देण्याचे आवाहन केले आहे.प्रशासनाने डॉल्बीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर ढोलपथकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विसर्जन मिरवणुकीला आता ढोलपथकाला पाचारण करण्यात येत आहे. त्यामुळे आता सांगलीतही हौशी ढोलपथके तयार होत आहे. त्यांचा रोज सराव सुरू आहे.

जत : सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडप उभारणीची लगभग सुरू झाली आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.