माडग्याळमध्ये एकास डेंग्यूची लागण | आरोग्य विभाग,ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष |
माडग्याळ,वार्ताहर : जत तालुक्यातील माडग्याळमध्ये सौ.पारुबाई दत्तात्रय सावंत (वय 50) यांना डेंग्यूची लागण झाली आहे.त्यांच्यावर जत येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.तसेच माडग्याळमध्ये मोठ्या प्रमाणात तापाची साथ वाढली आहे. आणखी डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.खाजगी हॉस्पिटल तापाच्या रुग्णांने फुल्ल झाले आहेत.ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा येथील जनतेला मोठा आर्थिक फटका बसत आहे.तात्काळ सर्व्हे करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.माडग्याळमध्ये सदाशिव नगर येथील सौ.पारुबाई दत्तात्रय सावंत यांना गेली दहा दिवस
झाले ताप थंडी,ताप,पेशी कमी होणे, सांधे दुखणे अशी लक्षण होती.तसेच त्यांनी माडग्याळ येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते.ताप कमी न झाल्याने पुढे जत येथे उपचार घेताना तपासणी केली असता डेंग्यूची लागण झालेचे निष्पण झाले आहे . जतमध्ये त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

माडग्याळमध्ये तापाचा साथींचा फैलाव झाला आहे.लहान मुलाना ताप येणे,याशिवाय सांधे दुखणे अशा लक्षणांनी अनेक नागरिक त्रस्त झाले आहेतमलेरिया व ताप रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.अनेकांना चिकनगुनियासदृश आजार झाल्याची लक्षणे आढळली आहेत. हातापायांचे सांधे दुखणे, ताप येणे अशी लक्षणे दिसत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
